Ranji Rrophy UP vs Haryana Match : देशांतर्गत क्रिकेटमध्ये सध्या रणजी करंडक स्पर्धा सुरु आहे. या स्पर्धेत अनेक भारतीय स्टार क्रिकेटर आपल्यातील धमक दाखवून देताना दिसत आहेत. आयपीएल स्टार आणि भारतीय टी-२० क्रिकेटमधील लोकप्रिय चेहरा असलेला रिंकू सिंह उत्तर प्रदेश संघाकडून खेळताना दिसत आहे. हरयाणा विरुद्धच्या सामन्यात त्याने तुफान फटकेबाजीचा नजराणा पेश करत चाहत्यांचे लक्षवेधून घेतले आहे.
रिंकू सिंहचा जलवा, १० चौकार अन् ३ षटकारासह बहरली त्याची खेळी
हरयाणाविरुद्धच्या सामन्यात उत्तर प्रदेशच्या संघाकडून सलामीवीर आर्यन जुयाल याने चांगली बॅटिंग केली. पण त्याला अन्य खेळाडूंची साथ लाभली नाही. मध्य फळीतील फलंदाज अगदी स्वस्तात बाद झाले. संघाची अवस्था ३ बाद ४३ धावा अशी असताना रिंकू सिंह फलंदाजीला आला. त्याने आर्यन जुयालच्या साथीनं संघाच्या डावाला आकार दिला. दोघांनी चौथ्या विकेटसाठी १६२ धावांची खेळी केली. रिंकू सिंह अगदी आक्रमक अंदाजात फटकेबाजी करताना पाहायला मिळाले. त्याने ११० चेंडूत १० चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ८९ धावांची खेळी केली. त्याला शतक झळकावण्याची संधी होती. पण त्याचे शतक ११ धावांनी हुकले.
फिनिशरच्या रुपात टीम इंडियात पक्की केलीये आपली जागा
रिंकू सिंह हा मर्यादित षटकांच्या सामन्यात टीम इंडियाचा नियमित सदस्य झाल्याचे दिसते. भारतीय टी-२० संघाचा तो अविभाज्य भाग असतो. आयपीएलमध्ये अशक्यप्राय वाटणाऱ्या सामन्याला कलाटणी देत त्याने टीम इंडियात फिनिशरच्या रुपात आपली जागा पक्की केलीये. रणजी ट्रॉफी स्पर्धेत त्याचा आक्रमकच अंदाज पाहायला मिळत आहे.
चहलची फिफ्टी थोडक्यात हुकली