Ranji Trophy 2022-23 : भारताचा युवा यष्टिरक्षक-फलंदाज संजू सॅमसन ( Sanju Samson) याला सातत्यपूर्ण कामगिरी करूनही भारतीय संघात स्थान मिळत नाही. त्यामुळे त्याचे चाहते नाराज आहेत, परंतु संजू त्याच्या मैदानावरील कामगिरीत कुठेच खंड पडू देत नाही... ३ वर्षांनंतर संजू आज रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत मैदानावर उतरला आणि केरळ संघाचे नेतृत्व त्याच्या खांद्यावर आहे. नेतृत्वाची जबाबदारी पार पडताना संजूने आज झारखंडविरुद्ध जोरदार फटकेबाजी केली.
इंग्रजांनी वस्त्रहरण केले अन् आता ICC ने पाकिस्तानचे वाभाडे काढले, एका ट्विटने जगासमोर 'उघडे' पाडले!
न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत संधी न देताच संजूला टीम इंडियाने मायदेशात पाठवले आणि उर्वरित खेळाडूंसह ते बांगलादेशला पोहोचले. राष्ट्रीय कर्तव्यापासून दूर असलेल्या संजूची रणजी करंडक स्पर्धेसाठीच्या केरळ संघात निवड झाली. त्याने पहिलाच सामना गाजवला. प्रथम फलंदाजीला उलेल्या केरळ संघाला रोहन प्रेम व रोहन कुन्नूम्मल यांनी चांगली सुरूवात करून दिली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी ९० धावा जोडल्या. कुन्नूम्मल ७१ चेंडूंत ५ चौकार व १ षटकारासह ५० धावांवर माघारी परतला. शॉन रॉजर ( १) व सचिन बेबी ( ०) हे अपयशी ठरल्यानंतर संजू व रोहन यांनी केरळचा डाव सावरला.
या दोघांनी ९१ धावा जोडल्या. रोहन २०१ चेंडूंत ९ चौकारांसह ७९ धावांवर बाद झाला. रोहन सावध खेळ करत होता, तर दुसऱ्या बाजूने संजूने फटकेबाजी केली. त्याने १०८ चेंडूंत ४ चौकार व ७ षटकारांसह ७२ धावा चोपल्या. अक्षय चंद्रन ३२ धावांवर खेळतो. केरळ संघाने ७८ षटकांत ६ बाद २४३ धावा केल्या आहेत. संजूने ५५ प्रथम क्षेणी क्रिकेटमध्ये ३१६२ धावा केल्या आहेत. त्यात १० शतक व १२ अर्धशतकांचा समावेश आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"