Join us  

Manish Pandey : IPL लिलावात काविया मारनने दुलर्क्षित केले, पण गौतम गंभीरने दाखवला विश्वास; त्याने आज २२ चेंडूंत कुटल्या १०८ धावा! 

इंडियन प्रीमिअर लीगच्या १५ व्या पर्वासाठी झालेल्या मेगा ऑक्शनमध्ये सनरायझर्स हैदराबाद ( SRH) संघाने त्यांच्या ताफ्यातील जुन्या खेळाडूंएवजी नव्यांनाच संधी दिली.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2022 7:08 PM

Open in App

इंडियन प्रीमिअर लीगच्या १५ व्या पर्वासाठी झालेल्या मेगा ऑक्शनमध्ये सनरायझर्स हैदराबाद ( SRH) संघाने त्यांच्या ताफ्यातील जुन्या खेळाडूंएवजी नव्यांनाच संधी दिली. त्या नाकारलेल्या खेळाडूंमधील एक मोठं नाव होतं ते मनिष पांडे ( Manish Pandey) याचं... आयपीएलच्या मागील काही पर्वात मनिषला साजेशी कामगिरी करता आली नाही, त्यामुळेच SRHने त्याला ताफ्यात न घेणेच योग्य समजले. आयपीएलच्या १५४ सामन्यांत ३०.६८च्या सरासरीने ३५६० धावा करणाऱ्या मनिषवर आयपीएलमध्ये नव्याने दाखल झालेल्या लखनौ सुपर जायंट्स ( Lucknow Super Kings ) संघाने विश्वास दाखवला. गौतम गंभीर ( Gautam Gambhir) मेंटॉर असलेल्या या संघाने मनिषसाठी ४.६० कोटी मोजले. त्यांनी दाखवलेला हा विश्वास मनिषने सार्थ ठरवला.

रणजी करंडक स्पर्धेत कर्नाटक संघाचे नेतृत्व सांभाळणाऱ्या मनिषने पहिल्याच दिवशी रेल्वे संघाच्या गोलंदाजांना धु धु धुतले. मयांक अग्रवाल ( १६), देवदत्त पडिक्कल ( २१) आणि रवीकुमार समर्थ ( ४७) यांना फार मोठी खेळी साकारता आली नाही. पण, कृष्णमुर्ती सिद्धार्थ व मनिष यांनी चौथ्या विकेटसाठी २६७ धावांची भागीदारी केली. सिद्धार्थने २२१ चेंडूंत १७ चौकार व २ षटकारांसह नाबाद १४० धावा केल्या. मनिषने १२१ चेंडूंत १५६ धावांची खेळी केली. त्यात १२ चौकार व १० षटकारांचा समावेश होता. या दोघांच्या फटकेबाजीच्या जोरावर कर्नाटकने पहिल्या दिवसअखेर ५ बाद ३९२ धावा केल्या.

लखनौ सुपर जायंट्स: लोकेश राहुल, मार्कस स्टॉयनिस, रवी बिष्णोई, क्विंटन डिकॉक ( ६.७५ कोटी),  मनीष पांडे ( ४.६० कोटी), दीपक हुडा ( ५.७५ कोटी), जेसन होल्डर ( ८.७५ कोटी),  कृणाल पांड्या ( ८.२५ कोटी), मार्क वूड ( ७.५० कोटी),  आवेश खान ( १० कोटी), अंकीत राजपूत ( ५० लाख), के गौतम ( ९० लाख), दुश्मंता चमीरा ( २ कोटी), शाहबाज नदीम ( ५० लाख), मनन वोहरा ( २० लाख), मोहसीन खान ( २० लाख), एव्हिन लुईस (  २ कोटी), आयुष बदोनी ( २० लाख), कायले मेयर्स ( ५० लाख), करन शर्मा ( २० लाख), मयांक यादव ( २० लाख)  

टॅग्स :रणजी करंडककर्नाटकसनरायझर्स हैदराबादलखनौ सुपर जायंट्स
Open in App