Manoj Tiwary, Ranji Trophy 2022 : रणजी करंडक स्पर्धेत पुन्हा एकदा क्रीडा मंत्री मनोज तिवारी ( Manoj Tiwari) ची चर्चा रंगली. मध्य प्रदेशविरुद्धच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात बंगालची अवस्था ५ बाद ५४ अशी झाली असताना मनोज तिवारी व शाहबाज अहमद ( Shahbaz Ahmed) यांनी वैयक्तिक शतक झळकावले. मध्य प्रदेशच्या पहिल्या डावातील ३४१ धावांच्या प्रत्युत्तरात बंगालचा निम्मा संघ ५४ धावांत माघारी परतला होता. तेव्हा मनोज तिवारी व शाहबाज यांनी सहाव्या विकेटसाठी १८३ धावांची भागीदारी केली. या दोघांनी उपांत्यपूर्व फेरीत झारखंडविरुद्धच्या सामन्यातही कमाल केली होती.
हिमांशू मंत्री याच्या १६५ धावा आणि कर्णधार अक्षत श्रीवास्तवच्या ६३ धावांच्या जोरावर मध्य प्रदेशने पहिल्या डावात ३४१ धावा केल्या. बंगालच्या मुकेश कुमार ( ४-६६) व शाहबाद ( ३-८६) यांनी सुरेख गोलंदाजी केली. प्रत्युत्तरा बंगालची सुरुवात निराशाजनक झाली. आघाडीच्या पाच फलंदाजांपैकी चौघांना दुहेरी धावा करताच आल्या नाही. कुमार कार्तिकेया व सारांष जैन यांनी बंगालला धक्के दिले. मनोज तिवारी व शाहबाज यांनी डाव सावरताना शतक पूर्ण केले. मनोजने २११ चेंडूंत १२ चौकारांच्या मदतीने १०२ धावा केल्या. उपांत्यपूर्व फेरीत त्याने झारखंडविरुद्ध ७३ व १३६ अशी कामगिरी केली होती.
पाहा व्हिडीओ..