Ranji Trophy 2024-25, Suryakumar Yadav Half Century After 14 Innings : एका बाजूला भारतीय वनडे संघाचा कॅप्टन रोहित शर्मानं कटकच्या मैदानातून दमदार सेंच्युरीसह कमबॅक केले.. त्यापाठोपाठ आता रणजी करंडक स्पर्धेतील सामन्यातून टी-२० कॅप्टन सूर्यकुमार यादव फार्मात आला आहे. रणजी ट्रॉफी स्पर्धेतील हरयाणा विरुद्धच्या उपांत्यपूर्व फेरीत मुंबईकडून खेळणाऱ्या सूर्यकुमार यादवनं अर्धशतकी खेळी केली. कोलकाता येईल ईडन गार्डन्सच्या मैदानातील तिसऱ्या क्वार्टर फायनलमध्ये त्याच्या खेळीनं मुबईच्या संघाला मजबूत स्थितीत नेलेच. पण सूर्यकुमार यादवसाठीही ही खेळी महत्त्वपूर्ण आहे. कारण सातत्याच्या अपयशानंतर त्याची बॅट तळपली आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
रोहितची बॅटिंग पाहून सूर्याही पेटला! अन् बॅटिंगला लागलेले 'ग्रहण' सुटलं
इंग्लंड विरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेत सूर्यकुमारच्या भात्यातून धावाच आल्या नव्हता. पाच सामन्यात त्याने फक्त २८ धावा केल्या होत्या. १४ ही त्याची सर्वोच्च खेळी होती. एका बाजूला वनडे आणि कसोटीत रोहित शर्मा फ्लॉप ठरत असताना दुसऱ्या बाजूला मिस्टर ३६० नावाने ओळखला जाणाऱ्या सूर्याच्या बॅटिंगलाही 'ग्रहण' लागले होते. हे ग्रहण आता सुटलं आहे. इग्लंड विरुद्धच्या रोहितच्या शतकी खेळीनंतर सूर्यकुमार यादवनं एक खास इन्स्टा स्टोरी शेअर केली होती. भल्या माणसाचं भलं होतं, म्हणत त्याने रोहितच्या शतकानंतर देवाचे आभार मानले होते. आता त्यालाही देव पावल्याचे दिसते. कारण रोहितची बॅटिंग बघून तोही पेटून उठल्याचे पाहायला मिळाले.
८६ चेंडूत ७० धावांची महत्त्वपूर्ण खेळी
इंग्लंड विरुद्धच्या टी-२० मालिकेनंतर सूर्यकुमार यादवचा रणजी स्पर्धेतील सामन्यांसाठी मुंबई संघाच्या ताफ्यात समावेश करण्यात आला होता. हरयाणाविरुद्धच्या पहिल्या डावात त्याला फक्त ९ धावा करता आल्या. पण दुसऱ्या डावात त्याने गोलंदाजांना आपल्या स्टाईलमध्ये चोपलं. ८ चौकार आणि २ षटकाराच्या मदतीने त्याने ८६ चेंडूत ७० धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. आंतरारष्ट्रीय आणि देशांतर्गत क्रिकेटमधील १४ डावांच्या दुष्काळानंतर त्याच्या भात्यातून अर्धशतकी खेळी पाहायला मिळाली. मागील १० डावात २० ही त्याची सर्वोच्च धावसंख्या होती.
Web Title: Ranji Trophy 2024-25 Suryakumar Yadav Half Century After 14 Innings Flop Shoe Mumbai vs Haryana Quarter Final
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.