Ranji Trophy Final Winner If Match Draw : क्रिकेट चाहत्यांसाठी २ मार्च हा सुपर संडे असेल. एका बाजूला चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत भारत-न्यूझीलंड यांच्यातील रंगत पाहायला मिळणार आहे. दुसऱ्या बाजूला रणजी करंडक स्पर्धेचा विजेताही ठरणार आहे. नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या मैदानात विदर्भ आणि केरळ या दोन संघात रणजी करंडक स्पर्धेसाठी फायनल रंगली आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
चौथ्या दिवसापर्यंत तिसरी इनिंगच; रणजी फायनल लढत अनिर्णित राहण्याच्या दिशेनं
चौथ्या दिवसाचा खेळ संपला त्यावेळी विदर्भ संघानं दुसऱ्या डावात करुण नायरच्या नाबाद १३२ धावांच्या खेळीच्या जोरावर ४ विकेट्सच्या मोबदल्यात धावफलकावर २४९ धावा लावत सामन्यात २८६ धावांनी मजबूत आघाडी घेतलीये. खेळाच्या चौथ्या दिवशीही तिसरी इनिंग सुरु होती. त्यामुळे हा सामना अनिर्णित राहण्याच्या दिशेनं झुकतोय, असे चित्र निर्माण झाले आहे. आता हा सामना अनिर्णित राहिला तर यंदाच्या हंगामात विजेता कोण? असा प्रश्न अनेक क्रिकेट चाहत्यांना पडला आहे. नजर टाकुयात काय आहे नियम? सामना अनिर्णित राहिल्यास कसा ठरवला जातो विजेता यासंदर्भातील खास स्टोरी
विदर्भ टेन्शन फ्री, केरळसमोर मोठं आव्हान
Who Is Winner If Vidarbha vs Kerala Final Match Ends Draw : रणजी स्पर्धेच्या फायनलमधील विदर्भ संघानं आधी दोन वेळा ही स्पर्धा जिंकली आहे. दुसरीकडे केरळ संघ पहिल्यांदाच सेमीफायनलमध्ये पोहचलाय. पाचव्या दिवसाच्या खेळात निकाल लागणे मुश्किलच दिसते. अखेरच्या दिवशी विदर्भ संघ टेन्शन फ्री मोडमध्ये असेल. यामागचं कारण मॅच ड्रॉ झाल्यावर लागू होणार नियम त्यांच्या बाजूनं आहे. दुसरीकडे केरळ संघाला इतिहास रचायचा असेल तर उर्वरित विकेट घेऊन मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करावा लागेल.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
सामना अनिर्णित राहिल्यास कोण ठरेल यंदाच्या रणजी स्पर्धेतील विजेता?
रणजी करंडक स्पर्धेतील नॉकआउट नियमानुसार, दोन्ही संघातील सामना अनिर्णित राहिला तर ज्या संघानं पहिल्या डावानंतर आघाडी घेतली आहे. तो संघ विजेता घोषित केला जातो. विदर्भ संघानं पहिल्यांदा फलंदाजी करताना पहिल्या डावात ३७९ धावा केल्या होत्या. या धावसंख्येचा पाठलाग करताना केरळ संघ ३४२ धावांवर आटोपला होता. पहिल्या डावात विदर्भ संघानं ३७ धावांची अल्प आघाडी मिळवली होती. जर सामना अनिर्णित राहिला तर विदर्भ संघाला यंदाच्या हंगामातील विजेता घोषित केले जाईल.