Ranji Trophy 2024 : रणजी करंडक २०२४ स्पर्धेची फायनल रोमांचक वळणावर आली आहे. विदर्भाने पहिल्या दिवशी यजमान मुंबईचा पहिला डाव ६४.३ षटकांत २२४ धावांत गुंडाळला. दुसऱ्या दिवशी विदर्भाकडून संघर्ष पाहायला मिळेल अशी अपेक्षा होती, परंतु मुंबईच्या गोलंदाजांनी कमाल केली. आपला शेवटचा प्रथम श्रेणी सामना खेळणाऱ्या धवल कुलकर्णीला खेळाडूंनी गार्ड ऑफ हॉनर दिला.
पृथ्वी शॉ आणि भूपेन लालवानी यांनी १२० चेंडूंत ८१ धावांची सलामी दिली. भूपेनने ६४ चेंडूंत ४ चौकारांसह ३७ धावा केल्या. पृथ्वी ६३ चेंडूंत ५ चौकारांसह ४६ धावा करून बाद झाला. मुंबईची मधली फळी ढेपाळल्यानंतर शार्दूलने बॅझबॉल क्रिकेट खेळताना विदर्भाच्या गोलंदाजांवर हल्ला चढवत ६९ चेंडूंत ८ चौकार व ३ षटकारांसह ७५ धावा केल्या आणि संगाला २२४ धावांपर्यंत पोहोचवले. मुंबईकरांनीही चांगले पुनरागमन करत पहिल्या दिवसाअखेर विदर्भ संघाची १३ षटकांत ३ बाद ३१ धावा अशी अवस्था केली होती.
दुसऱ्या दिवशी मुंबईच्या गोलंदाजांनी कमाल करून दाखवली. धवल कुलकर्णी ( ३-१५), शाम्स मुलानी ( ३-३२) व तनुष कोटियन ( ३-७) यांनी प्रत्येकी ३ विकेट्स घेऊन विदर्भाचा डाव १०५ धावांत गुंडाळला आणि मुंबईला पहिल्या डावात ११९ धावांची आघाडी मिळवून दिली. विदर्भाकडून सलामीवीर अथर्व तायडे ( २३) व व्हाय राठोड ( २७) यांच्यानंतर व्हाय ठाकूर (१६) याने सर्वाधिक धावा केल्या.