Join us

Ranji Trophy 2024 Final : पृथ्वी शॉ पुन्हा फेल; ठाकूरच्या चेंडूवर बेल्स कुठच्या कुठे उडाल्या, Video 

दुसऱ्या डावात आक्रमक फटकेबाजी करून पृथ्वी मुंबईला मोठी आघाडी मिळवून देईल, अशी अपेक्षा होती. पण, तसे झाले नाही.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2024 15:54 IST

Open in App

Ranji Trophy 2024 Final :  भारतीय फलंदाज पृथ्वी शॉ ( Prithvi Shaw) याला रणजी करंडक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात हवा तसा प्रभाव पाडला नाही. वानखेडे स्टेडियमवर मुंबई आणि विदर्भ यांच्यातल्या जेतेपदाच्या लढतीत पृथ्वी दुसऱ्या डावातही अपयशी ठरला. विदर्भाविरुद्ध सुरू असलेल्या फायनलमध्ये मुंबई फ्रंटसीटवर आहे. पहिल्या डावात २२४ धावा केल्यानंतर त्यांनी विदर्भाचा पहिला डाव १०५ धावांवर गुंडाळला आणि ११९ धावांची आघाडी घेतली.  

दुसऱ्या डावात आक्रमक फटकेबाजी करून पृथ्वी मुंबईला मोठी आघाडी मिळवून देईल, अशी अपेक्षा होती. पण, तसे झाले नाही. विदर्भाच्या गोलंदाजांनी नवीन चेंडूने मुंबईच्या फलंदाजांना खूप त्रास दिला. पृथ्वीने सुरवातीला चांगले फटके मारले, परंतु यश ठाकूरच्या वेगवान चेंडूवर त्याचा त्रिफळा उडवला. त्याने टाकलेल्या चेंडूचा फलंदाजाला काहीच सुगावा लागला नाही आणि बॅट अन् पॅडमधून तो यष्टींवर आदळला. यश ठाकूरने १३३.४kph च्या वेगाने टाकलेल्या चेंडूवर पृथ्वी ११ धावांवर त्रिफळाचीत झाला. भुपेन लालवानी ( १८) माघारी परतल्याने मुंबईची अवस्था २ बाद ३४ झाली होती. अजिंक्य रहाणे व मुशीर खान खिंड लढवतोय. मुंबईने ३५ षटकांत २ बाद ८८ धावा केल्या. 

 

पहिल्या डावात पृथ्वी शॉ ( ४६) आणि भूपेन लालवानी ( ३७) यांनी १२० चेंडूंत ८१ धावांची सलामी दिली. शार्दूल ठाकूरने  ६९ चेंडूंत ८ चौकार व ३ षटकारांसह ७५ धावा केल्या आणि संगाला २२४ धावांपर्यंत पोहोचवले. दुसऱ्या दिवशी मुंबईच्या गोलंदाजांनी कमाल करून दाखवली. धवल कुलकर्णी ( ३-१५), शाम्स मुलानी ( ३-३२) व तनुष कोटियन ( ३-७) यांनी प्रत्येकी ३ विकेट्स घेऊन विदर्भाचा डाव १०५ धावांत गुंडाळला आणि मुंबईला पहिल्या डावात ११९ धावांची आघाडी मिळवून दिली.  

टॅग्स :रणजी करंडकपृथ्वी शॉ