Ranji Trophy 2024 : तामिळनाडूचा यष्टीरक्षक फलंदाज नारायण जगदीसन ( Narayan Jagadeesan) याने रणजी ट्रॉफीमध्ये पुन्हा एकदा अप्रतिम खेळी केली आहे. चंदीगड विरुद्ध खेळल्या जात असलेल्या सामन्यात जगदीसनने तिहेरी शतक झळकावले आणि १९८९ सालचा तामिळनाडूकडून डब्लू व्ही रमन यांनी नोंदवलेला विक्रम मोडला. जगदीसनचे हे सलग सलग दुसरे द्विशतक ठरले. याआधी जगदीसनने रेल्वेविरुद्धच्या रणजी सामन्यात २४५ धावांची नाबाद खेळी केली होती.
SRH ला IPL पूर्वी 'हिरा' सापडला; पठ्ठ्याने ६० चेंडूंत २९२ धावा चोपून विक्रमांचा पाऊस पाडला
रणजी करंडक स्पर्धेत किमान दोन द्विशतके करणारा तो तामिळनाडूचा तिसरा फलंदाज ठरला. त्याच्या आधी डब्ल्यूव्ही रमणने १९८८-८९ च्या मोसमात ३ द्विशतके झळकावली होती. त्याच रमण यांनी १९९१-९२ मध्ये २ द्विशतके झळकावली होती. जगदीसनच्या आधी अभिनव मुकुंदने २०११-१२ हंगामात दोन द्विशतके झळकावण्याचा पराक्रमही केला होता.
चंदीगडने तामिळनाडूविरुद्धच्या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पण, पहिल्या डावात चंदीगडचा संघ १११ धावांत ऑलआऊट झाला. संदीप वॉरियर आणि आर साई किशोर यांनी प्रत्येकी ३ बळी घेतले. तामिळनाडूने दुसऱ्या दिवशी ४ बाद ६१० धावांवर डाव घोषित केला आणि ४९९ धावांची आघाडी घेतली. तामिळनाडूकडून प्रदोश रंजन पॉल ( १०५) व बाबा इंद्रजित ( १२३) यांनीही शतक झळकावले.