Join us  

Ranji Trophy completes 5000 matches : अभिमानास्पद! रणजी ट्रॉफी ५००० Not Out... पहिला सामना कोणत्या दोन संघात झाला होता माहित्ये का?

भारताच्या स्वातंत्र्यापूर्वीच सुरू झालीय रणजी ट्रॉफी स्पर्धा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 03, 2022 2:11 PM

Open in App

Ranji Trophy completes 5000 matches : भारतीय क्रिकेटमध्ये देशांतर्गत स्तरावर प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या रणजी ट्रॉफी स्पर्धेत गुरूवारी ऐतिहासिक सामन्याला सुरूवात झाली. गुरुवार, ३ मार्चला रणजी ट्रॉफीच्या इतिहासातील ५ हजारावा सामना खेळण्यात आला. जम्मू-काश्मीर आणि रेल्वे या दोन संघात हा ऐतिहासिक सामना सुरू झाला. त्यामुळे आजचा दिवस हा भारतीय क्रिकेटसाठी विशेष महत्त्वाचा आहे.

पहिला सामना कधी अन् कोणामध्ये?

देशातील सर्व राज्यांच्या क्रिकेट संघांदरम्यान दरवर्षी रणजी करंडक खेळला जातो. या स्पर्धेचा इतिहास ८८ वर्षांचा आहे. भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी म्हणजेच १९३४ पासून ही स्पर्धा खेळवली जात आहे. रणजी करंडक स्पर्धेतील पहिला सामना हा मद्रास (आताचे चेन्नई) आणि म्हैसूर यांच्यात चेपॉक स्टेडियमवर खेळण्यात आला होता. पहिल्या हंगामाचे विजेतेपद मुंबईच्या संघाने (तत्कालीन बॉम्बे) उत्तर भारताचा पराभव मिळवलं होतं.

पहिला आणि ५०००वा सामना चेन्नईत

रणजी ट्रॉफीचा पहिला सामना चेपॉकच्या मैदानात झाला. आणि आता स्पर्धेतील ऐतिहासिक ५०००वा सामनादेखील चेन्नईत खेळवला जात आहे, हीदेखील योगायोगाची बाब आहे. फक्त स्टेडियम चेपॉक ऐवजी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ग्राउंड हे आहे.

मुंबईने जिंकलीत सर्वाधिक ४१ विजेतेपदं

रणजी करंडक स्पर्धेने भारतीय संघाला अनेक दिग्गज खेळाडू दिले. भारतीय संघातील निवडीसाठी रणजी ट्रॉफीतील कामगिरी हा एक महत्त्वाचा आधार मानला जातो. या जोरावर युवा खेळाडूंना टीम इंडियात संधी मिळते. या स्पर्धेतील विक्रमांवर नजर टाकली तर आतापर्यंत मुंबई संघाने सर्वाधिक वेळा (४१) विजेतेपद पटकावले आहे. हा संघ रणजी ट्रॉफीच्या पहिल्या सत्रापासून खेळत आहे. गेल्या हंगामात सौराष्ट्र संघाने बाजी मारली होती.

टॅग्स :रणजी करंडकमुंबईचेन्नईजम्मू-काश्मीर
Open in App