Shreyas Iyer Another Duck Baroda vs Mumbai, Elite Group A Match : टीम इंडियाचा मध्यफळीतील भरवशाचा फलंदाज श्रेयस अय्यरला 'बेभरवशा'चा खेळाडू असा टॅग लागला आहे. कामगिरीतील सातत्याच्या अभावामुळे त्याच्यावर टीम इडियातील स्थान गमावण्याची वेळ आली. पुन्हा संघात कमबॅकसाठी तो देशांतर्गत स्पर्धेत उतरतोय खरा. पण त्याला इथं काही यश मिळताना दिसत नाही. रणजी करंडक स्पर्धेतही त्याचा फ्लॉप शो पाहायला मिळाला.
अनकॅप्ड भिडूसमोर झिरो ठरला टीम इंडियातील हिरो
या प्रतिष्ठित देशांतर्गत स्पर्धेत तो मुंबई संघाचे प्रतिनिधीत्व करताना दिसत आहे. पण दुलीप करंडक स्पर्धेप्रमाणं या स्पर्धेतील त्याची सुरुवात खराब झालीये. वडोदरा विरुद्धच्या सामन्यात ८ चेंडूचा सामना करून त्याला खाते न उघडता तंबूत परतावे लागले. अनकॅप्ड भार्गव भट याने अक्षय मोरेकरवी त्याला झेलबाद केले.
देशांतर्गत क्रिकेटमध्ये फ्लॉप शोचा सिलसिला कायम
श्रेयस अय्यर टीम इंडियातील कमबॅकसाठी धडपडताना दिसतोय. यासासाठी तो दुलीप करंडक स्पर्धेतही मैदाात उतरला होता. पण तिन्ही फेरीत त्याला अपयश आले होते. त्याच्या भात्यातून एकही मोठी खेळी आली नाही. रणजी करंडक स्पर्धेआधी इराणी कप स्पर्धेतील सामन्यासाठीही तो मुंबई संघाचा भाग होता. शेष भारत विरुद्धच्या या सामन्यात त्याने पहिल्या डावात अर्धशतक झळकावले. पण दुसऱ्या डावात १२ चेंडूचा सामान करून तो फक्त ८ धावा करून माघारी फिरला होता. या फ्लॉप शोमुळेच न्यूझीलंड विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठीही त्याच्या नावाचा विचार झालेला नाही. आता रणजी स्पर्धेतील फ्लॉप शोनंतर त्याच्या समस्या आणखी वाढणार असल्याचे संकेत मिळतात.
बीसीसीआयला श्रेयस अय्यरपेक्षा सर्फराजवर भरवसा
रिषभ पंतच कमबॅक आणि सर्फराज खान याचे चॅलेंजिग खेळी यापुढे श्रेयस अय्यर फिका ठरला आहे. परिणामी ही दोघे संघात आल्यापासून श्रेयस अय्यर संघाबाहेर पडला आहे. रणजी करंडक स्पर्धेत दमदार कमबॅक करून टीम इंडियाचे दरवाजे ठोठावण्याची त्याचा पहिला डाव तर वाया गेल्याचे दिसते. आता यातून सावरून तो पुन्हा आपल्यातील क्षमता सिद्ध करण्यात यशस्वी ठरणार का? ते पाहण्याजोगे असेल.
Web Title: Ranji Trophy Elite 2024-25 Shreyas Iyer Another Duck Baroda vs Mumbai, Elite Group A Match
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.