Ranji Trophy : मोहम्मद अझरुद्दीनची हवा; फायनल मॅचमधील त्याचा हा फ्लाइंग कॅच बघाच!

मोहम्मद अझरुद्दीन याने अप्रतिम झेल टिपत संघाला यश मिळवून देण्यात उचलला मोलाचा वाटा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2025 11:38 IST2025-03-01T11:34:05+5:302025-03-01T11:38:17+5:30

whatsapp join usJoin us
Ranji Trophy Elite 2024 25 Vidarbha vs Kerala Final Mohammed Azharuddeen Brilliant Flying Catch Watch Video | Ranji Trophy : मोहम्मद अझरुद्दीनची हवा; फायनल मॅचमधील त्याचा हा फ्लाइंग कॅच बघाच!

Ranji Trophy : मोहम्मद अझरुद्दीनची हवा; फायनल मॅचमधील त्याचा हा फ्लाइंग कॅच बघाच!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Vidarbha vs Kerala Ranji Trophy  Final Mohammed Azharuddeen Brilliant Flying Catch  Video  : रणजी करंडक स्पर्धेतील अंतिम सामन्यातील चौथ्या दिवसाच्या खेळात विदर्भ संघाच्या दुसऱ्या डावाची सुरुवात खराब झाली.  पार्थ रेखाडे आणि ध्रुव शौर्यी दोन्ही सलामीवीर स्वस्तात मागे फिरले. दुसऱ्या डावात विदर्भ संघाच्या धावफलकावर अवघ्या ५ धावा असताना जलाज सक्सेना याने पार्थला चकवा देत त्याला त्रिफळाचित केले. त्यानंतर निधीशच्या गोलंदाजीवर विकेटमागे मोहम्मद अझरुद्दीनचा (Mohammed Azharuddeen) जलवा पाहायला मिळाला.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

मोहम्मद अझरुद्दीनची कमाल; विकेटमागे फ्लाइंग कॅच घेत संघाच्या यशात उचलला मोठा वाटा

 बीसीसीआयने एक्स अकाउंटवरून कॅचसह पहिल्या विकेटचा व्हिडिओ शेअर केला आहे.  नागपूर येथील विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या घरच्या मैदानात रंगलेल्या सामन्यात विदर्भ संघानं ३७ धावांच्या अल्प आघाडीसह दुसऱ्या डावाची सुरुवात केली. पण पहिल्या डावाप्रमाणे यावेळीही संघाची सुरुवात खराब झाली. मोहम्मद अझरुद्दीन याने घेतलेला कॅच कमालीचा अन् पुन्हा पुन्हा पाहण्याजोगा असाच आहे.  विकेटमागे सर्वोत्तम क्षेत्ररक्षणाचा नजराणा दाखवून देत त्यानं संघाला दुसरे यश मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला. 

कॅप्टन सचिन बेबीच्या शतकासह केरळा संघाचं आघाडीचं गणित बिघडलं

नागपूरच्या मैदानात रंगलेल्या सामन्यात केरळचा कर्णधार सचिन बेबी याने टॉस जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. दानिश मालेवार (Danish Malewar) याने २८५ चेंडूत केलेली १५३ धावांची खेळी आणि करूण नायरच्या १८८ चेंडूतील ८६ धावांच्या दमदार खेळीच्या जोरावर विदर्भ संघानं पहिल्या डावात ३७९ धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना केरळच्या ताफ्यातून कॅप्टन सचिन बेबीनं जबरदस्त रिप्लाय दिला. पण तो नर्व्हस नाइंटीचा शिकार झाला. २३५ चेंडूत ९८ धावांवर त्याची विकेट पडली. त्याच्याशिवाय सरावटेनं केलेल्या १८५ चेंडूतील ७९ धावांच्या खेळीच्या जोरावर केरळा संघानं आपल्या पहिल्या डावात ३४२ धावांपर्यंत मजल मारली.

पुन्हा दाननिश अन् करुणच्या खांद्यावर डाव सावरण्याची जबाबदारी

चौथ्या दिवसाच्या खेळात दुसऱ्या डावात सलामी जोडीच्या रुपात धक्क्यावर धक्के देत केरळ संघानं  विदर्भ संघाचे टेन्शन वाढवलं आहे. या धक्क्यातून सावरत केरळसमोर आव्हानात्मक टार्गेट सेट करण्याची जबाबदारी आता पुन्हा एकदा दानिश मालेवार आणि करुण नायर यांच्यावर येऊन पडली आहे. 
 

Web Title: Ranji Trophy Elite 2024 25 Vidarbha vs Kerala Final Mohammed Azharuddeen Brilliant Flying Catch Watch Video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.