मुंबई : गेल्या चार सामन्यांत पाच शतके ठोकणा-या मयंक अग्रवालसह चार फलंदाजांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर कर्नाटकने रणजी ट्रॉफी उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत शुक्रवारी दुस-या दिवशी ४१ वेळा जेतेपदाचा मान मिळवणा-या मुंबई संघाविरुद्ध पहिल्या डावात मोठी आघाडी घेतली. कर्नाटकने दुसºया दिवसअखेर ६ बाद ३९५ धावांची दमदार मजल मारली. कर्नाटकने २२२ धावांची आघाडी घेतली आहे. मुंबई संघाचा पहिला डाव १७३ धावांत संपुष्टात आला. कर्नाटकच्या आघाडीच्या जवळजवळ सर्वंच फलंदाजांनी योगदान दिले. त्यात मयंक अग्रवाल (७८), कुनैन अब्बास (५०), सी.एम. गौतम (७९) व श्रेयस गोपाल (नाबाद ८०) यांनी अर्धशतके झळकावली.
पदार्पणाचा प्रथम श्रेणी सामना खेळत असलेला मध्यमगती गोलंदाज शिवम दुबे आतापर्यंत मुंबईतर्फे सर्वाधिक यशस्वी गोलंदाज ठरला आहे. त्याने ७९ धावांच्या मोबदल्यात ५ बळी घेतले आहेत. शुक्रवारी दुसºया दिवसाचा खेळ थांबला त्या वेळी गोपालसह कर्णधार विनयकुमार (३१) खेळपट्टीवर होता. विनयकुमारने गुरुवारी हॅट््ट्रिकसह सहा बळी घेत मुंबईचा डाव गुंडाळण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
कर्नाटकने १ बाद ११५ धावसंख्येवरून पुढे खेळण्यास सुरुवात केली. शिवम मल्होत्राने यंदाच्या मोसमात सर्वाधिक धावा फटकावणाºया अग्रवालला बाद करीत मुंबई संघाला सर्वांत मोठे यश मिळवून दिले. करुण नायरला (१६) मोठी खेळी करता आली नाही. नायरला बाद करणाºया दुबेने त्यानंतर पवन देशपांडे (८) व अब्बास यांना तंबूचा मार्ग दाखवित कर्नाटकची ५ बाद २१८ अशी स्थिती केली. त्यानंतर गौतम व गोपाल यांनी सहाव्या विकेटसाठी १०३ धावांची भागीदारी करीत कर्नाटकचा डाव सावरला. दुबेने गौतमला पायचित करीत पदार्पणाच्या लढतीत पाच बळी घेण्याचा पराक्रम केला. त्यानंतर विनयकुमारने गोपालला योग्य साथ देत दिवसअखेर संघाला सुस्थिती गाठून दिली. या दोघांनी सातव्या विकेटसाठी ७४ धावांची अभेद्य भागीदारी केली आहे.
Web Title: Ranji Trophy: Karnataka leads the big lead, Mumbai are 222 runs behind
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.