Ranji Trophy : एखाद्या सामन्यात चक्क एका संघानं १००० धावांचा टप्पा ओलांडला तुम्हाला कदाचित विश्वास बसणार नाही. परंतु रणजी ट्रॉफी २०२२ च्या प्री क्वार्टर फायनल मॅचमध्ये असा कारनामा पाहायला मिळाला आहे. असे मोठे विक्रम क्रिकेटमध्ये क्वचितच पाहायला मिळतात. झारखंडनं रणजी ट्रॉफी २०२२ च्या प्री क्वार्टर फायनल सामन्यात नागालँड विरोधात १२९७ धावा कुटत गोलंदाजांची अक्षरश: दमछाक केली.
झारखंडनं बुधवारी कोलकात्याच्या इडन गार्जनमध्ये खेळवण्यात आलेल्या रणजी ट्रॉफी २०२२ च्या खेळवण्यात आलेल्या प्री क्वार्टर फायनल सामन्यात नागालँडच्या संघाला हरवत क्वार्टर फायनलमध्ये स्थान मिळवलं. या सामन्यात झारखंडच्या संघानं तब्बल १२९७ धावा ठोकल्या. या सामन्याच्या पहिल्या डावात त्यांनी ८८० धावा केल्या. यानंतरही झारखंडच्या फलंदाजांचं मन भरलं नाही. त्यांनी दुसऱ्या डावात ४१७ धावा ठोकल्या.
गोलदांजांची दमछाकया सामन्यात नागालँडच्या गोलंदांजांची दमछाक झाली. भारतीय संघासाठी खेळलेल्या सौरभ तिवारीच्या नेतृत्वाखाली झारखंडच्या संघानं या सामन्यात १२९७ धावा केल्या. पहिल्या डावात झारखंडनं ८८० धावा कुटल्या. त्यानंतर या धावांचा पाठलाग करताना झारखंडचा संघ २८९ धावांवर आटोपला. यानंतर झारखंडला ५९१ धावांची आघाडी मिळाली. परंतु यानंतरही झारखंडनं नागालँडला फॉलोऑन दिला नाही. अखेर पंचांनी हा सामना अनिर्णित घोषित केला. या सामन्यात नागालँडच्या खेळाडूंचा बहुतांश वेळ हा फिल्डिंग करण्यातच गेला. यादरम्यान, त्यांनी २९४ पेक्षा अधिक ओव्हर्स टाकल्या.