Ranji Trophy, Karn Sharma: 2 वर्षांपासून IPL पासून राहिला वंचित; आता एकाच सामन्यात घेतले 8 बळी! 

आजपासून रणजी ट्रॉफी स्पर्धेच्या हंगामाला सुरुवात झाली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2022 07:11 PM2022-12-13T19:11:13+5:302022-12-13T19:12:13+5:30

whatsapp join usJoin us
Ranji Trophy, Railways captain Karn Sharma took 8 wickets for 38 runs in an innings against Vidarbha | Ranji Trophy, Karn Sharma: 2 वर्षांपासून IPL पासून राहिला वंचित; आता एकाच सामन्यात घेतले 8 बळी! 

Ranji Trophy, Karn Sharma: 2 वर्षांपासून IPL पासून राहिला वंचित; आता एकाच सामन्यात घेतले 8 बळी! 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

नवी दिल्ली : आजपासून रणजी ट्रॉफी स्पर्धेच्या हंगामाला सुरुवात झाली असून पहिल्याच दिवशी दोन वेळा विजेत्या विदर्भाची अवस्था बिकट झाली आहे. विदर्भाचा संघ त्यांच्या घरच्या मैदानावर रेल्वेविरुद्ध खेळत आहे, मात्र पहिल्याच दिवशी संघाने चाहत्यांना निराश केले. विदर्भाच्या संघाने पहिल्या डावात केवळ 213 धावा केल्या. रेल्वेच्या संघाचा कर्णधार कर्ण शर्माने एकाच डावात 8 बळी घेऊन विदर्भाची कंबर मोडली. कर्ण शर्माच्या घातक गोलंदाजीच्या जोरावरच विदर्भाला रोखण्यात रेल्वे संघाला यश आले.

दरम्यान, कर्णने पहिल्या डावात 19.4 षटकात केवळ 38 धावा दिल्या आणि आठ बळी घेतले. प्रथम श्रेणीतील या गोलंदाजाची ही आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी आहे. कर्ण शर्मा भारताच्या आंतरराष्ट्रीय संघातूनही खेळला आहे. या लेग-स्पिनरने भारतासाठी एक कसोटी, दोन एकदिवसीय आणि एक ट्वेंटी-20 सामना खेळला आहे आणि एकूण पाच बळी घेतले आहेत. 

कर्णच्या फिरकीसमोर विदर्भचा करेक्ट कार्यक्रम 
रेल्वेच्या संघाला आदर्श सिंगने पहिला बळी मिळवून दिला. त्याने संजय रघुनाथला बाद केले. यानंतर विदर्भाचा कर्णधार फैज फझल आणि अथर्व तायडे यांनी उत्कृष्ट शतकी भागीदारी करत संघाला 150 धावांपर्यंत नेले. मात्र कर्ण शर्माने तायडेला बाद करून विदर्भाला मोठा धक्का दिला. तायडेने 43 धावा करून तंबूत परतला. येथून इथून कर्ण शर्माने बळी घेण्याची मालिकाच सुरू केली.  

विदर्भाचा कर्णधार फझल संघाला सावरत होता. पण कर्ण शर्माच्या फिरकीने त्यांचा डाव 213 धावांवर संपवला. या फलंदाजाने 219 चेंडूंचा सामना करत 12 चौकारांच्या मदतीने 112 धावा केल्या. कर्णने 213 च्या एकूण धावसंख्येवर आदिक्य ठाकरेला बाद करत विदर्भाचा डाव संपवला. कर्ण शर्मा आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्ज, मुंबई इंडियन्सकडून खेळला आहे. मागील हंगामात तो रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूमध्ये होता. मात्र, त्याला दोन वर्षांपासून आयपीएल खेळण्याची संधी मिळालेली नाही.

विदर्भाने रचला इतिहास
खरं तर विदर्भाची गणना कधीकाळी कमकुवत संघांमध्ये होत होती, मात्र प्रशिक्षक चंद्रकांत पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली या संघाने सलग दोनदा रणजी ट्रॉफीचे विजेतेपद पटकावले. याशिवाय त्यांनी इराणी ट्रॉफीही जिंकली आहे. विदर्भाच्या संघाने 2018-19 आणि 2019-20 मध्ये देखील रणजी ट्रॉफीचा किताब जिंकला होता. फझलच्या नेतृत्वाखाली त्यांनी ही विजेतेपदे जिंकली आणि भारताचा स्थानिक क्रिकेटचा दिग्गज वसीम जाफर देखील या संघाचा एक भाग होता.

 सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

 

Web Title: Ranji Trophy, Railways captain Karn Sharma took 8 wickets for 38 runs in an innings against Vidarbha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.