Join us  

रणजी चषक: श्रेयस अय्यर, सिद्धेश लाड यांची नाबाद शतके, मुंबईची ओडिशाविरुद्ध भक्कम पकड

Ranji Trophy 2024: गतविजेत्या मुंबईने शानदार फलंदाजीच्या जोरावर यंदाच्या रणजी चषक स्पर्धेतील आपल्या चौथ्या सामन्यात ओडीशाविरुद्ध बुधवारी पहिल्याच दिवशी ९० षटकांत ३ बाद ३८५ धावांचा डोंगर उभारला. 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 07, 2024 6:06 AM

Open in App

- रोहित नाईकमुंबई - गतविजेत्या मुंबईने शानदार फलंदाजीच्या जोरावर यंदाच्या रणजी चषक स्पर्धेतील आपल्या चौथ्या सामन्यात ओडीशाविरुद्ध बुधवारी पहिल्याच दिवशी ९० षटकांत ३ बाद ३८५ धावांचा डोंगर उभारला. श्रेयस अय्यरने नाबाद दीडशतक, तर सिद्धेश लाडने नाबाद शतक ठोकले. १३ धावांवर खेळत असताना सिद्धेशचा झेल सुटला होता. हे जीवदान ओडिशाला खूप महागडे ठरले.

- पहिल्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा अय्यर १६४ चेंडूंत १८ चौकार व ४ षटकारांसह नाबाद १५२ धावांवर, तर सिद्धेश २३४ चेंडूंत १४ चौकारांसह नाबाद ११६ धावांवर खेळत होता. दोघांनी चौथ्या गड्यासाठी २९८ चेंडूंत २३१ धावांची नाबाद भागीदारी केली. - बीकेसी येथील एमसीए स्टेडियमवर सुरू असलेल्या या सामन्यात ओडिशाने नाणेफेक जिंकून यजमानांना फलंदाजीचे निमंत्रण दिले. आयुष म्हात्रेला (१८) झटपट बाद करत ओडिशाने दमदार सुरुवात केली. परंतु, अंगक्रिश रघुवंशी व सिद्धेश यांनी दुसऱ्या गड्यासाठी २११ चेंडूंत १३५ धावांची भागीदारी केली.-  बिप्लब समंत्रे याने ४१व्या षटकातील पहिल्या दोन चेंडूवर अंगक्रिश व कर्णधार अजिंक्य रहाणे यांना बाद करत मुंबईला हादरे दिले. अंगक्रिशचे पहिले रणजी शतक केवळ २ धावांनी हुकले. त्याने १२४ चेंडूंत १३ चौकार व ३ षटकारांसह ९८ धावा केल्या. यानंतर मात्र लाड-अय्यर यांनी सर्व सूत्रे आपल्याकडे घेतली.

संक्षिप्त धावफलक :मुंबई (पहिला डाव) : ९० षटकांत ३ बाद ३८५ धावा (श्रेयस अय्यर खेळत आहे १५२, सिद्धेश लाड खेळत आहे ११६, अंगक्रिश रघुवंशी ९२; बिप्लब समंत्रे २/३६, सूर्यकांत प्रधान १/३६.)

टॅग्स :रणजी करंडकमुंबईश्रेयस अय्यर