रणजी करंडक : यजमानांच्या पहिल्या डावात ३१२ धावा; सौराष्ट्र ५ बाद १५८

डावखुरा फिरकीपटू आदित्य सरवटेने स्टार फलंदाज चेतेश्वर पुजारासह आघाडीच्या तीन खेळाडूंना तंबूचा मार्ग दाखविला. त्यामुळे गतविजेत्या विदर्भ संघाने सौराष्ट्रविरुद्ध रणजी ट्रॉफीच्या फायनलमध्ये दुसऱ्या दिवशी सोमवारी आपले पारडे काहीअंशी वरचढ ठेवले.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2019 06:07 AM2019-02-05T06:07:26+5:302019-02-05T06:07:52+5:30

whatsapp join usJoin us
 Ranji Trophy: Vidarbha 312 runs in the first innings | रणजी करंडक : यजमानांच्या पहिल्या डावात ३१२ धावा; सौराष्ट्र ५ बाद १५८

रणजी करंडक : यजमानांच्या पहिल्या डावात ३१२ धावा; सौराष्ट्र ५ बाद १५८

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

नागपूर - डावखुरा फिरकीपटू आदित्य सरवटेने स्टार फलंदाज चेतेश्वर पुजारासह आघाडीच्या तीन खेळाडूंना तंबूचा मार्ग दाखविला. त्यामुळे गतविजेत्या विदर्भ संघाने सौराष्ट्रविरुद्ध रणजी ट्रॉफीच्या फायनलमध्ये दुसऱ्या दिवशी सोमवारी आपले पारडे काहीअंशी वरचढ
ठेवले.
विदर्भ क्रिकेट संघटनेच्या जामठा स्टेडियममध्ये खेळल्या जात असलेल्या या लढतीत पुजारा केवळ एक धाव करून तंबूत परतला. त्यामुळे पाहुणा सौराष्ट्र संघ बॅकफूटवर ढकलला गेला. विदर्भाच्या पहिल्या डावातील ३१२ धावसंख्येच्या प्रत्युत्तरात खेळताना सौराष्ट्रने दुसºया दिवसअखेर ५ बाद १५८ धावा केल्या आहेत. सौराष्ट्र संघ पहिल्या डावात अद्याप १५४ धावांनी पिछाडीवर असून, त्यांच्या पाच विकेट शिल्लक आहेत. सौराष्ट्रची भिस्त यष्टिरक्षक फलंदाज स्नेल पटेलवर अवलंबून आहे. तो ८७ धावा काढून नाबाद आहे. त्याला प्रेरक मांकड (१६) साथ देत आहे. सरवटेने ५५ धावांच्या मोबदल्यात तीन बळी घेतले. अक्षय वखरेने दोन बळी घेत त्याला योग्य साथ दिली.
त्याआधी, विदर्भाच्या तळाच्या फलंदाजांनी विशेषत: अक्षय कर्णेवारने (नाबाद ७३) कारकिर्दीत झळकाविलेल्या दुसºया अर्धशतकाच्या जोरावर विदर्भाने ७ बाद १९६ धावसंख्येवरून सावरत आव्हानात्मक मजल मारली. अक्षय वखरेने ३४ धावांचे उपयुक्त योगदान दिले. त्यानंतर त्याने आॅफ स्पिन माºयाच्या जोरावर दोन महत्त्वाचे बळीही घेतले.
विदर्भ पहिल्या दिवसअखेर बॅकफूटवर होता; पण तळाच्या फलंदाजांनी आणि पुजाराला स्वस्तात बाद करीत त्यांनी दुसºया दिवसअखेर पारडे वरचढ राखले. सौराष्ट्रची २ बाद ७९ अशी स्थिती असताना पुजारा खेळपट्टीवर दाखल झाला. सरवटेच्या गोलंदाजीवर त्याचा उडालेला झेल स्लिपमध्ये तैनात वसीम जाफरच्या हातात विसावला.
सरवटेने त्यापूर्वी हार्विक देसाई (१०) याला पायचित केले, तर त्यानंतर विश्वराज जडेजाला (१८) तंबूचा मार्ग दाखविला. वखरेने अर्पित वासवदा (१३) आणि शेल्डन जॅक्सन (९) यांना बाद करीत सौराष्ट्रच्या मधल्या फळीला खिंडार पाडले.
त्याआधी, विदर्भाने ७ बाद २०० धावसंख्येवरून पुढे खेळताना कर्णेवारच्या शानदार खेळीच्या जोरावर ३०० चा पल्ला ओलांडला.

धावफलक

विदर्भ पहिला डाव : फैज फझल धावबाद १६, संजय रामास्वामी झे. वसवदा गो. उनाडकट ०२, वसीम जाफर झे. पटेल गो. उनाडकट २३, मोहित काळे झे. देसाई गो. मकवाना ३५, गणेश सतीश झे. पटेल गो. मांकड ३२, अक्षय वाडकर झे. मांकड गो. सकारिया ४५, आदित्य सरवटे झे. देसाई गो. जडेजा ००, अक्षय कर्णेवार नाबाद ७३, अक्षय वखरे त्रि.गो. सकारिया ३४, उमेश यादव झे. पटेल गो. उनाडकट १३, रजनीश गुरबानी त्रि.गो. मकवाना ०६. अवांतर (३३). एकूण १२०.२ षटकांत सर्वबाद ३१२.गोलंदाजी : उनाडकट २४-७-५४-३, सकारिया २१-९-४४-२, मांकड २३-७-४१-१, धर्मेंद्रसिंग जडेजा २८-६-८३-१, कमलेश मकवाना २४.२-१-५८-२.
सौराष्ट्र पहिला डाव : हार्विक देसाई पायचित गो. सरवटे १०, स्नेल पटेल खेळत आहे ८७, विश्वराज जडेजा पायचित गो. सरवटे १८, चेतेश्वर पुजारा झे. जाफर गो. सरवटे ०१, अर्पित वसवदा झे. जाफर गो. वखरे १३, शेल्डल जॅक्सन झे. वाडकर गो. वखरे ०९, प्रेरक मांकड खेळत आहे १६. अवांतर (४). एकूण ५९ षटकांत ५ बाद १५८. गोलंदाजी : उमेश यादव १३-५-१७-०, आदित्य सरवटे २०- ६-५५-३, अक्षय वखरे १२-०-४२-२.

Web Title:  Ranji Trophy: Vidarbha 312 runs in the first innings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.