Join us  

Video : राशिद खान रॉक्स, बॅट्समन शॉक्स; अफगाण खेळाडूच्या फिरकीपुढे अंपायरचा निर्णयही पाहिला नाही

Big Bash League 2021-22: बिग बॅश लीग २०२१ च्या १६ व्या सामन्यात सिडनी सिक्सर्सनं अॅडलेड स्ट्रायकर्सचा (Sydney Sixers vs Adelaide Strikers) ४ विकेट्सनं पराभव केला.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2021 10:44 AM

Open in App

Big Bash League 2021-22: बिग बॅश लीग २०२१ च्या १६ व्या सामन्यात सिडनी सिक्सर्सनं अॅडलेड स्ट्रायकर्सचा (Sydney Sixers vs Adelaide Strikers) ४ विकेट्सनं पराभव केला. या सामन्यात राशिद खानची (Rashid Khan) गोलंदाजी कमालीची झाली. राशिद खानच्या उत्तम गोलंदाजीनंतरही अॅडलेडला हा सामना जिंकता आला नाही. असं असलं तरी आपल्या जबरदस्त गोलंदाजीनं त्यानं फलंदाजांनाही अंदाज घेऊ दिला नाही. रशिदनं आपल्या गोलंदाजीदरम्यान, मोयसेस हेनरिक्स, डॅनिअल ह्युजेस आणि डॅनिअल ख्रिश्चियन याला बाद केलं.

विशेष करून ज्या प्रकारे डॅनिअल ख्रिश्चियन याला राशिद खाननं मिस्ट्री बॉलवर ज्याप्रकारे एलबी डब्ल्यू केलं तो चेंडू कमाल होता. राशिदनं गुगली टाकत फलंदाजाला आपल्या जाळ्यात ओढलं. चेंडू पिचवर आदळल्यानंतर तेजीनं फलंदाजाच्या पॅडवर लागला. चेंडू पॅडवर लागताच ख्रिश्चियन यालाही आपण बाद असल्याचं समजलं. अशातच अंपायरचा निर्णय येण्यापूर्वीच तो पॅव्हिलियनच्या दिशेने निघाला. परंतु राशिद खानला हॅट्ट्रिक घेता आली नाहगी. राशिदनं १७ व्या ओव्हरच्या दुसऱ्या बॉलवर पहिल्यांदा हेनरिक्सची विकेट घेतली. त्याच्याच पुढच्या बॉलवर ख्रिश्चियनदेखील आऊट झाला. राशिदनं घेतलेल्या या दोन विकेट्सचा व्हिडीओ बीबीएनं आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुनही शेअर केला आहे. या व्हिडीओला नेटकऱ्यांचीही मोठी पसंती मिळताना दिसतेय. बीबीएलच्या इतिहासात राशिदनं आतापर्यं ७८ विकेट्स घेतल्या आहेत.

टॅग्स :अफगाणिस्तानआॅस्ट्रेलिया
Open in App