सेमी फायनलपूर्वी राशिद खानवर ICC ची कारवाई; बांगलादेशविरुद्धच्या लढतीतील चूक भोवली

अफगाणिस्तानने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारून इतिहास घडवला.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2024 10:35 PM2024-06-26T22:35:50+5:302024-06-26T22:36:24+5:30

whatsapp join usJoin us
Rashid Khan guilty of breaching ICC Code of Conduct during the ICC Men’s T20 World Cup 2024 Group 1 match against Bangladesh. | सेमी फायनलपूर्वी राशिद खानवर ICC ची कारवाई; बांगलादेशविरुद्धच्या लढतीतील चूक भोवली

सेमी फायनलपूर्वी राशिद खानवर ICC ची कारवाई; बांगलादेशविरुद्धच्या लढतीतील चूक भोवली

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

T20 World Cup 2024 : अफगाणिस्तानने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारून इतिहास घडवला. कर्णधार राशिद खान ( Rashid Khan) याच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तानने प्रचंड मेहनत, आत्मविश्वास अन् सांघिक कामगिरीच्या जोरावर मोठी झेप घेतली. पण, कर्णधार राशिद खान याला बांगलादेश विरुद्धच्या सामन्यादरम्यान ICC आचारसंहितेचे उल्लंघन केल्याबद्दल फटकारण्यात आले आहे. 


राशिदने खेळाडू आणि खेळाडू सहाय्य कर्मचाऱ्यांसाठीच्या ICC आचारसंहितेच्या कलम २.९ चे उल्लंघन केल्याचे आढळून आले. ज्याचा अर्थ त्याने आंतरराष्ट्रीय सामन्यात अयोग्य किंवा धोकादायक पद्धतीने खेळाडूवर किंवा त्याच्या जवळ चेंडू (किंवा क्रिकेट उपकरणाची कोणतीही वस्तू) फेकली. या व्यतिरिक्त, राशिदच्या शिस्तभंगाच्या रेकॉर्डमध्ये एक डिमेरिट पॉइंट जोडला गेला आहे. ही त्याची २४ महिन्यांच्या कालावधीतील हा पहिली चूक आहे.  


अफगाणिस्तानच्या डावाच्या शेवटच्या षटकात ही घटना घडली, जेव्हा राशिदने खेळलेल्या शॉटवर त्याचा सहकारी करीम जनातने दुसरी धाव घेण्यास नकार दिली आणि त्यानंतर राशिदने आपली बॅट त्याच्या दिशेने जमिनीवर फेकली. राशिदने चूक मान्य केली आणि आयसीसी मॅच रेफरींच्या एमिरेट्स एलिट पॅनेलच्या रिची रिचर्डसनने प्रस्तावित केलेली कारवाई मंजुरी स्वीकारली, त्यामुळे औपचारिक सुनावणीची गरज भासली नाही. 

Web Title: Rashid Khan guilty of breaching ICC Code of Conduct during the ICC Men’s T20 World Cup 2024 Group 1 match against Bangladesh.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.