Rashid Khan Record, IPL 2022: गुजरात टायटन्स उपकर्णधार फिरकीपटू राशिद खानने शनिवारच्या सामन्यात एक विशेष कामगिरी केली. राशिदने IPL कारकिर्दीत बळींचे शतक पूर्ण केले. शनिवारी कोलकाता नाइट रायडर्स (केकेआर) विरुद्धच्या सामन्यात हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) गुजरात संघाने विजय मिळवला. या सामन्यात राशिदने व्यंकटेश अय्यरला अभिनव मनोहरच्या हस्ते झेलबाद करत ही विशेष कामगिरी केली. २३ वर्षीय राशिद खान हा IPL मध्ये १०० बळी घेणारा केवळ दुसरा विदेशी फिरकी गोलंदाज ठरला. राशिदच्या आधी कोलकाता नाईट रायडर्सच्या सुनील नरिनलाच अशी कामगिरी करता आली होती.
IPL मध्ये १०० बळी घेणारा रशीद हा चौथा फिरकीपटू आणि एकूण १६वा विदेशी गोलंदाज आहे. तसेच, फिरकीपटू म्हणून जलदगतीने १०० विकेट्स घेण्याच्या बाबतीत राशीद खान संयुक्तपणे पहिल्या क्रमांकावर पोहोचला.
सर्वात वेगवान १०० विकेट घेणारा गोलंदाज-
८३ सामने- अमित मिश्रा / राशिद खान
८४ सामने- युझवेंद्र चहल
८६ सामने- सुनील नरिन
श्रीलंकेचा दिग्गज लसिथ मलिंगा हा IPL मध्ये सर्वात जलद १०० बळी घेणारा गोलंदाज ठरला. संपूर्ण IPL कारकीर्दीत मुंबई इंडियन्सकडून खेळणाऱ्या मलिंगाने केवळ ७० डावांमध्ये २०च्या सरासरीने १०० बळी पूर्ण केले. यॉर्कर किंग म्हणून प्रसिद्ध असलेल्या मलिंगाने १२२ सामन्यांत १७० विकेट्स घेऊन आपली IPL कारकीर्द पूर्ण केली.
Web Title: Rashid Khan Record fastest spinner to take 100 ipl wickets IPL 2022 gt vs kkr live updates
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.