नवी दिल्ली - जगभरात नववर्षाचं मोठ्या उत्साहाने स्वागत केलं जात आहे. भारतीय क्रिकेट टीम सध्या दक्षिण अफ्रिकेच्या दौ-यावर असून सर्व खेळाडूंनी नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. भारतीय क्रिकेट संघ 56 दिवसांच्या दक्षिण अफ्रिका दौ-यावर आहे. दक्षिण अफ्रिकेत भारत तीन कसोटी, सहा एकदिवसीय आणि तीन टी-20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. या मालिकेची सुरुवात 5 जानेवारीपासून होणार आहे. दरम्यान खेळाडू आणि सपोर्ट स्टाफचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यामधील एक फोटो भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांचा आहे. रवी शास्त्री यांनी नवीन वर्षाच्या शुभेच्छा देताना दक्षिण अफ्रिकेतील एका पबमधील फोटो अपलोड केला आहे.
या फोटोमध्ये रवी शास्त्री डिस्क जॉकीच्या (डीजे) भूमिकेत दिसत आहेत. भारतीय क्रिकेट संघाच्या चाहत्यांनी यानंतर रवी शास्त्री यांना 'DJ वाले बाबू' म्हणण्यास सुरुवात केली. ट्विटरवर अनेक युजर्सनी रवी शास्त्री यांच्या फोटोवर कमेंट करत 'डीजेवाले बाबू मेरा गाना बजा दो' असं म्हटलं आहे. काही युजर्सनी रवी शास्त्री यांनी 5 जानेवारीपासून सुरु होणा-या कसोटी मालिकेत चांगलं प्रदर्शन करण्यासाठी शुभेच्छा दिल्या, तर काहींनी हा रवी शास्त्रींचा 'स्वॅग' असल्याचं म्हटलं.
रवी शास्त्री यांनी भारतीय क्रिकेट संघाचं प्रशिक्षकपद हाती घेतल्यापासून भारतीय संघाने जबरदस्त कामगिरी केली आहे. मात्र दक्षिण अफ्रिकेचा दौरा विराट कोहली आणि संघासाठी आव्हानात्मक असल्याचं बोललं जात आहे.
मालिका सुरु होण्याआधी केपटाऊनमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत रवी शास्त्री यांनी सांगितलं होतं की, 'आमचे अनेक खेळाडू आपल्या खेळाने समाधानी होऊ इच्छित आहेत. हे समाधान तेव्हाच मिळतं तेव्हा तुम्ही परदेशात धावा करता किंवा विकेट्स मिळवता. त्यामुळे हे आमच्यासाठी एक आव्हान आहे.
विराट कोहली दुस-या स्थानी कायम, आयसीसी कसोटी मानांकनभारतीय कर्णधार विराट कोहली आयसीसी कसोटी फलंदाजांच्या मानांकनामध्ये आॅस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथनंतर दुस-या स्थानी कायम आहे तर अॅशेस मालिकेतील चौथ्या लढतीत नाबाद द्विशतकी खेळी करणाºया अॅलिस्टर कूकने नऊ स्थानांची प्रगती करताना आठव्या स्थानी झेप घेतली आहे.
मेलबोर्न व पोर्ट एलिझाबेथ कसोटी सामने संपल्यानंतर रविवारी जाहीर झालेल्या मानांकनामध्ये कुकने द्विशतकी खेळीच्या जोरावर वर्षाचा शेवट अव्वल १० खेळाडूंमध्ये स्थान राखत केला आहे. ३३ वर्षीय सलामीवीर कुकच्या नाबाद २४४ धावांच्या खेळीच्या जोरावर इंग्लंडने चौथ्या कसोटी सामन्यात पहिल्या डावात ४९१ धावांची मजल मारली. वर्षाची सुरुवात १५ व्या स्थानावर करणारा कुक अॅशेस मालिकेत १० व्या मानांकनासह सहभागी झाला होता. कुकच्या तुलनेत १७ मानांकन गुणांची आघाडी घेत दक्षिण आफ्रिकेचा हाशिम अमला सातव्या स्थानी आहे.
स्मिथने मेलबोर्न सामन्यात ७६ व नाबाद १०२ धावांची खेळी करीत अव्वल स्थान अधिक मजबूत केले. स्मिथच्या नावावर ९४७ मानांकन गुणांची नोंद असून तो भारतीय कर्णधाराच्या तुलनेत ५४ मानांकन गुणांनी आघाडीवर आहे.