Join us  

जावेद मियाँदादनं भारतीय संघाबद्दल वापरले होते अपशब्द, रवी शास्त्री बूट हातात घेऊन धावले मारायला! 

भारताचे माजी खेळाडू व सध्याचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी त्यांच्या 'स्टारगेजिंग: द प्लेयर्स इन माय लाइफ' या पुस्तकात जावेद मियाँदादसोबतचा एक किस्सा लिहिला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2021 12:45 PM

Open in App

भारत-पाकिस्तान क्रिकेट सामना म्हटलं की प्रचंड तणाव, वातावणात जाणवणारी संघर्षाची गर्मी अन् शाब्दिक चकमक हे ओघानं आलेच... पण भारतानं शेजारील राष्ट्राशी सर्व संबंध तोडल्यानंतर क्रिकेट सामन्यांतील ही टशन फार कमीच पाहायला मिळते. उभय देशांतील क्रिकेट सामन्यांमधील असे अनेक प्रसंग आहेत की ते आजही आठवले जातात. जावेद मियाँदाद हा भारतीय खेळाडूंना डिवचण्यासाठी नेहमीच आघाडीवर असायचा. १९९२च्या वर्ल्ड कपमध्ये भारताचे यष्टिरक्षक किरण मोरे यांच्यासोबत झालेला वाद, त्यानंतत शाहजाह येथे चेतन शर्मा यांच्या अखेरच्या चेंडूवर षटकार खेचून पाकिस्तानला मिळवून दिलेला विजय, यामुळे मियाँदादची नेहमी चर्चा रंगते. पण, यात आणखी एका प्रसंगाची भर पडली आहे.

पाकिस्तानच्या फवाद आलमनं मोडला चेतेश्वर पुजाराचा मोठा विक्रम; ठरला आशियात अव्वल!

भारताचे माजी खेळाडू व सध्याचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी त्यांच्या 'स्टारगेजिंग: द प्लेयर्स इन माय लाइफ' या पुस्तकात जावेद मियाँदादसोबतचा एक किस्सा लिहिला आहे. १९८७साली पाकिस्तानचा संघ भारत दौऱ्यावर आला होता आणि त्यावेळी हा प्रसंग घडला. शास्त्री यांनी लिहिले की,''१९८७साली पाकिस्तानचा संघ भारत दौऱ्यावर आला होता. त्यावेळी हैदराबाद येथे झालेला वन डे सामना जिंकल्यानंतर माझं अन् मियाँदादशी भांडण झालं होतं. तो सामना खूप चुरशीचा झाला होता. अखेरच्या चेंडूवर अब्दुल कादिरने धाव घेतली आणि सामना टाय झाला. पाकिस्ताननं त्या सामन्यात सात विकेट्स गमावल्या होत्या, तर आमचे सहा फलंदाज बाद झाले होते.  त्यावेळच्या नियमानुसार ज्या संघाच्या कमी विकेट्स पडल्या त्याला अशा परिस्थितीत विजयी घोषित केलं गेलं. म्हणजेच आम्ही हा सामना जिंकलो.''

IND vs ENG : तिसऱ्या कसोटीपूर्वी टीम इंडियाच्या खेळाडूंच्या फोटोसोबत खोडसाळपणा, Photo Viral

शास्त्रींनी सांगितले की मियाँदादला हे आवडलं नाही आणि तो प्रचंड नाराज झाला. त्यांनी पुढे लिहिले की,''या निर्णयानं मियाँदाद प्रचंड नाराज झाला होता. सामना संपल्यानंतर तो आमच्या ड्रेसिंग रुममध्ये आला आणि आम्ही अप्रामाणिकपणानं हा सामना जिंकला. हे ऐकून सर्वांना राग आला. मी माझे बूट उचलले आणि पाकिस्तानच्या ड्रेसिंग रुमपर्यंत त्याला मारण्यासाठी त्याच्या मागे धावलो. तेथे इम्रान खाननं मधस्थी करत हा वाद मिटवला.''

''आम्ही दोघं हा प्रसंग लगेच विसरलोही. जेव्हा संघ पुढील सामन्यासाठी प्रवास करत होते, तेव्हा मी आणि मियाँदादनं विमानात बऱ्याच गप्पा मारल्या. तेव्हाही त्या प्रसंगाबद्दल चर्चा झाली नाही,''असेही शास्त्रींनी लिहिले आहे. 

टॅग्स :रवी शास्त्रीभारत विरुद्ध पाकिस्तानजावेद मियादाद
Open in App