भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसरा सामना भारताने एक डाव व 202 धावांनी जिंकला. या विजयासह भारतीय संघाने तब्बल 84 वर्षांपूर्वीचा एक विक्रम मोडीत काढला आहे. भारताने हा भीमपराक्रम पहिल्यांदाच केल्याचे पाहायला मिळत असल्याचे वृत्त आहे. भारताने या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत दोन वेळा दक्षिण आफ्रिकेवर फॉलोऑन लादला. यापूर्वी भारताने एका मालिकेत कोणत्याही संघाला तब्बल दोनदा फॉलोऑन देऊन मोठे विजय मिळवलेले नाहीत. आतापर्यंत एका मालिकेत दोन किंवा त्यांच्यापेक्षा जास्तवेळा दक्षिण आफ्रिकेला फॉलोऑन देण्याची घटना तब्बल 84 वर्षांनी घडली आहे. यापूर्वी 1935 साली ऑस्ट्रेलियाने असा पराक्रम केला होता. या सामन्यानंतर झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी वादग्रस्त विधान केलं. त्यांच्या या विधानाचा नेटिझन्सनी चांगलाच समाचार घेतला.
तिसऱ्या कसोटीतही पाहुण्यांनी शरणागती पत्करली. भारताच्या पहिल्या डावातील 9 बाद 497 ( डाव घोषित) धावांचा पाठलाग करताना आफ्रिकेचा डाव 162 धावांत गडगडला. उमेश यादव, मोहम्मद शमी, रवींद्र जडेजा, शाहबाज नदीम यांनी उत्तम गोलंदाजी केली. एकवेळी आफ्रिकेचा डाव 3 बाद 107 असा मजबूत स्थितीत दिसत होता, परंतु भारतीय गोलंदाजांनी त्यांना जबरदस्त धक्के दिले. भारताने पहिल्या डावात 335 धावांची आघाडी घेतली आहे. कर्णधार विराट कोहलीनं फॉलोऑन देऊन ऐतिहासिक कामगिरी केली. दुसऱ्या डावातही आफ्रिकेला 133 धावा करता आल्या.
या ऐतिहासिक विजयानंतर झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात शास्त्रींना काही प्रश्न विचारण्यात आले. त्यावर त्यांनी वादग्रस्त विधान दिले. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओत शास्त्री, भाड मे गया पिच! असे विधान केले.
पाहा व्हिडीओ...
नेटिझन्सनेही त्याचा चांगलाच समाचार घेतला