Join us  

Virat Kohli आणखी 2 वर्ष कसोटी कर्णधारपदावर राहिला असता, परंतु अनेकांना त्याचे यश पचले नसते; Ravi Shastri यांचा खळबळजनक दावा

Ravi Shastri opens up on Virat Kohli's Test captaincy - ट्वेंटी-२० संघाचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतल्यानंतर विराटकडून BCCIनं वन डे संघाचेही कर्णधारपद काढून घेतले. त्यानंतर दक्षिण आफ्रिका दौऱ्यावरील पराभवामुळे विराटनं कसोटी संघाचे नेतृत्वही सोडले.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2022 5:37 PM

Open in App

Ravi Shastri opens up on Virat Kohli's Test captaincy - भारतीय संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री ( Ravi Shastri) यांनी विराट कोहलीच्या ( Virat Kohli) कसोटी कर्णधारपद सोडण्यावर मोठं विधान केलं आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धची कसोटी मालिका गमावल्यानंतर 24 तासांत विराटनं कसोटी संघाचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला. 33 वर्षीय विराटच्या या निर्णयानं सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आणि त्यात शास्त्री यांचाही समावेश आहे. विराट कोहली आणखी दोन वर्ष तरी कसोटी संघाच्या कर्णधारपदावर कायम राहिला असता,परंतु त्याचे यश अऩेकांच्या पचनी पडले नसते, असा दावा शास्त्री यांनी केला. 

ट्वेंटी-२० संघाचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतल्यानंतर विराटकडून BCCIनं वन डे संघाचेही कर्णधारपद काढून घेतले. त्यानंतर दक्षिण आफ्रिका दौऱ्यावरील पराभवामुळे विराटनं कसोटी संघाचे नेतृत्वही सोडले. विराटच्या नेतृत्वाखाली भारतानं सर्वाधिक ४० ( ६८ सामन्यांपैकी) कसोटी सामने जिंकले. शिवाय भारतानं कसोटीत अव्वल स्थानापर्यंत झेप घेतली. हा निर्णय घेण्यापूर्वी विराट व बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांच्यातल्या वादाच्या चर्चाही रंगल्या. पण, शास्त्री यांनी विराटनं या सर्वाकडे दुर्लक्ष करून स्वतःच्या फलंदाजीवर लक्ष केंद्रीत करावे असा सल्ला दिला.

India Todayला दिलेल्या मुलाखतीत शास्त्री म्हणाले,''विराट कोहलीनं कसोटी संघाच्या कर्णधारपदावर कायम राहायला हवे होते की नाही, तर हो. त्यानं आणखी दोन वर्ष तरी कसोटी संघाचे नेतृत्व संभाळले असते. पुढील दोन वर्षांत भारतीय संघ घरच्या मैदानावर खेळणार आहे आणि त्यांचा मुकाबला कसोटी क्रमवारीत 9-10 क्रमांकावर असलेल्या संघांसोबत आहे. त्यामुळे कर्णधार म्हणून त्याच्या नावावर 50-60 विजय नक्की नोंदवले गेले असते, परंतु हे अनेक लोकांना पचनी पडले नसते. त्यांची पोट दुखी सुरू झाली असती.'' 

ते पुढे म्हणाले,''दोन वर्ष त्यानं सक्षमपणे हे नेतृत्व पार पाडले असते, परंतु त्याच्या निर्णयाचा आदर करायला हवा.  दुसऱ्या देशात हे विक्रम अविश्वसनीय ठरले असते. तुम्ही ऑस्ट्रेलिया, इंग्लंड यांच्याविरुद्ध जिंकला आणि दक्षिण आफ्रिकेतील पराभव, परंतु त्यानं कर्णधारपदावर रहावं की नाही, ही चर्चा सुरु राहिली असती.''

टॅग्स :रवी शास्त्रीविराट कोहली
Open in App