मुंबई : वेस्ट इंडिज दौऱ्यात भारतीय संघाने दमदार विजय मिळवले. या दौऱ्यावरून आता भारतीय खेळाडू मायदेशी परतले आहेत. पण या दौऱ्यावर जाण्यापूर्वी कर्णधार विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्यामध्ये भांडण झाल्याची चर्चा होती. विराट आणि रोहित यांच्यामधील भांडणाबाबत भारताचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी मौन सोडल्याचे वृत्त आले आहे. शास्त्री विराट आणि रोहित यांच्यातील भांडणाबद्दल शास्त्री यांनी नेमके काय सांगितले ते जाणून घ्या...
भारताचा कर्णधार विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्यामधून विस्तवही जात नसल्याचे म्हटले जाते. विश्वचषकात जेव्हा भारताचा उपांत्य फेरीत पराभव झाला तेव्हा कोहली आणि रोहित यांच्यामध्ये वितुष्ट असल्याचे वृत्त आले होते. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील एकदिवसीय मालिकेत रोहित आणि कोहली मैदानात फलंदाजीसाठी एकत्र आले होते. त्यावेळी या दोघांमध्ये चांगला समन्वय पाहायला मिळाला नाही. त्यावेळी या दोघांमध्ये भांडण झाल्याची शंका चाहत्यांना आली होती.
शास्त्री हे सलग दुसऱ्यांदा भारताचे मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्त झाले आहेत. त्यामुळे गेल्या पाच वर्षांपासून शास्त्री हे विराट आणि रोहित या दोघांनाही ओळखतात. बरेच विजय आणि पराभव त्यांनी पाहिले आहेत. त्यामुळे संघातील विराट आणि रोहित यांच्यातील भांडणाबद्दल तेच अधिकारवाणीने बोलू शकतात.
वेस्ट इंडिजवरून परतल्यावर शास्त्री यांना विराट आणि रोहित यांच्यातील भांडणाबद्दल विचारण्यात आले. यावर शास्त्री म्हणाले की, " या प्रश्नाचे खरे उत्तर तुम्हाला देतो. विराट आणि कोहली यांच्यामध्ये भांडण असल्याची गोष्ट निराधार आहे. गेली पाच वर्षे मी दोघांना जवळून पाहतो आहे. विराट आणि रोहित यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे भांडण नाही."
Web Title: Ravi Shastri leaves silence over controversy between Virat Kohli and Rohit Sharma
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.