Join us  

Ravi Shastri on Hardik Pandya, IPL 2022: हार्दिक पांड्याच्या Team India तील स्थानाबद्दल रवी शास्त्रींची भविष्यवाणी, म्हणाले...

हार्दिक अनेक महिने क्रिकेटपासून दूर होता.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2022 7:14 PM

Open in App

Ravi Shastri on Hardik Pandya, IPL 2022: भारतीय संघाचा (Team India) अष्टपैलू हार्दिक पांड्या गेल्या काही महिन्यांपासून क्रिकेटपासून दूर होता. सोमवारी गुजरात टायटन्स (Gujarat Titans) संघाच्या नेतृत्वाच्या निमित्ताने त्याने क्रिकेटच्या मैदानात पुन्हा पाऊल ठेवलं. गुजरातने लखनौ संघावर थरारक विजय मिळवला. सामन्यात भारतीय चाहत्यांनी सुखावणारी एक गोष्ट घडली. बराच काळ गोलंदाजी न करणाऱ्या हार्दिकने सोमवारी संपूर्ण चार षटकं टाकली आणि त्यानंतर मैदानात येऊन दमदार फलंदाजीही केली. त्याच्या या बहुप्रतिक्षित पुनरागमनानंतर टीम इंडियाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी एक महत्त्वाचं विधान केलं.

"हार्दिक पांड्या फिट आहे हे स्पष्ट झालं. आधीच्या काही फोटोंवरून त्याने मधल्या काळात खूर मेहनत केली असल्याचंही दिसत आहे. आतापासून पुढच्या चार महिन्यांत टी२० वर्ल्ड कप होणार आहे. त्यामुळे त्याला सर्वोत्तम फिटनेस राखणं गरजेचंच आहे. सामन्याच्या आधी तो गोलंदाजी करत होता. त्यावेळीच मला भारतीय क्रिकेटसाठी हे चांगले संकेत असल्याचं दिसलं होतं. कारण तो जेव्हा फलंदाजी सोबतच गोलंदाजीही करतो त्यावेळी संघाची ताकद वाढते. तसेच हार्दिकच्या खेळण्यातही विशिष्ट प्रकारचा आत्मविश्वास दिसून येतो", असं रवी शास्त्री म्हणाले.

"हार्दिक फिट असेल तर IPL मध्ये त्यापेक्षा भारी काहीच नाही. कारण तो मॅचविनर आहे आणि त्यासोबतच चाहत्यांचे मनोरंजन होईल अशी फटकेबाजीही करतो. स्पर्धेच्या सुरुवातीलाच तो पूर्णपणे तंदुरूस्त आहे ही चांगली गोष्ट आहे. हार्दिक पांड्या फिट असेल आणि गोलंदाजीही करू शकत असेल तर त्याला संघातील स्थानाची चिंता करण्याचं कारण नाही. उलट इतरांनाच थोडं टेन्शन येऊ शकतं. हार्दिक पांड्या मॅचविनर आहे, स्मार्ट बॉलर आहे, सीमारेषेवर उत्तम फिल्डर आहे. त्यामुळे ते एक परिपूर्ण पॅकेज आहे", असं मोठं वक्तव्य शास्त्रींनी केलं.

टॅग्स :आयपीएल २०२२हार्दिक पांड्यारवी शास्त्रीभारतीय क्रिकेट संघ
Open in App