भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांना अनेकदा सोशल मीडियावर त्यांच्या मद्य पिण्याच्या सवयीवरून ट्रोल केले गेले. त्यामुळे लॉकडाऊनमध्ये मद्यविक्रिला सरकारनं परवानगी दिल्यानंतर तळीरामांसह शास्त्री यांना आनंद होणे साहजिकच होते. त्यामुळे मंगळवारी बिअर घेण्यासाठी जाणार असे त्यांनी एका चॅट शो दरम्यान सांगितले होते, याचवेळी त्यांनी या दोन खेळाडूंसोबत बीअर प्यायला आवडते, असेही सांगितले. आता मंगळवारी त्यांना बीअर मिळाली की नाही, हे अजून कळलेलं नाही.
Sony Ten Pit Stop या कार्यक्रमात शास्त्री म्हणाले की,''आम्ही ऑरेंज झोनमध्ये येतो आणि आशा करतो की मंगळवारी मला बीअर खरेदी करता येईल. लक्ष्मण शिवरामकृष्णन आणि रॉजर बिन्नी या दोघांसोबत मैफील जमवण्याची मजा निराळीच आहे. मी सध्या अलिबाग येथे आहे आणि आज रात्री मी बीअर घेण्यासाठी जाणार आहे. जर मला मैफील जमवायची असेल तर मी रॉजर आणि शिवा यांची निवड करीन.''
यावेळी शास्त्री यांनी 1985च्या वर्ल्ड चॅम्पियन्सशीप फायनलमधील पाकिस्तानविरुद्धच्या लढतीचेही किस्से सांगितले.''जावेद मियादाँदला ऑडी मिळण्याची शक्यता फार कमीच होती, परंतु त्यासाठी तो प्रयत्नशील होता. म्हणून माझं लक्ष विचलित करण्यासाठी तो प्रयत्न करत होता. तो चांगला खेळाडू आणि प्रतिस्पर्धी आहे. प्रतिस्पर्धी खेळाडूचे लक्ष विचलित करण्यासाठी तो सर्वतोपरी प्रयत्न करायचा. पण, त्या सामन्यात ते शक्य नव्हते. माझे लक्ष त्या ऑडीवरच होते आणि कितीही प्रयत्न करून त्याला माझे लक्ष विचलित करता आले नाही,''असे शास्त्रींनी सांगितले.
Virat Kohli च्या 11 वर्षांच्या सोबत्याचे निधन; अनुष्का शर्मानं वाहिली श्रद्धांजली
Shah Rukh Khan आणखी एक संघ खरेदी करणार; तीन संघांचा मालक होणार