WTC Final 2023 : ऑसींना हरवण्यासाठी रवी शास्त्रींनी सूचवली प्लेइंग इलेव्हन; रोहित, विराट अन्...

भारतीय संघ ७ ते ११ जून या कालावधीत ICC World Test Championship final मध्ये ऑस्ट्रेलियाचा सामना करणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2023 05:24 PM2023-05-24T17:24:03+5:302023-05-24T17:24:24+5:30

whatsapp join usJoin us
Ravi Shastri predicts India XI for the fast-approaching ICC World Test Championship Final | WTC Final 2023 : ऑसींना हरवण्यासाठी रवी शास्त्रींनी सूचवली प्लेइंग इलेव्हन; रोहित, विराट अन्...

WTC Final 2023 : ऑसींना हरवण्यासाठी रवी शास्त्रींनी सूचवली प्लेइंग इलेव्हन; रोहित, विराट अन्...

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

भारतीय संघ ७ ते ११ जून या कालावधीत ICC World Test Championship final मध्ये ऑस्ट्रेलियाचा सामना करणार आहे. विराट कोहलीसह संघातील सात खेळाडू लंडनमध्ये दाखल झाले आहेत आणि रोहित शर्मासह उर्वरित खेळाडू दोन तुकड्यांमध्ये आयपीएल फायनलनंतर दाखल होतील. भारतीय संघाला मागच्या वेळीत WTC Final मध्ये न्यूझीलंडकडून हार मानावी लागली होती. पण, यावेळी रोहितच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ ICC स्पर्धांच्या जेतेपदाचा दुष्काळ संपवण्यासाठी सज्ज आहे. त्यासाठी माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी ( Ravi Shastri) यांनी टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन जाहीर केली आहे. 

WTC Final 2023 : रवी शास्त्री यांचा ४ भारतीयांवर विश्वास; INDvsAUS प्लेइंग इलेव्हनमध्ये ७ ऑसी


शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली भारताने २०२१मध्ये इंग्लंडमध्ये ऐतिहासिक कसोटी जिंकली होती. त्यामुळे त्यांनी सूचवलेली प्लेइंग इलेव्हन महत्त्वाची ठरणार आहे. भारताने या सामन्यासाठी जाहीर केलेल्या संघात आर अश्विन, रवींद्र जडेजा आणि अक्षर पटेल हे तीन फिरकीचे पर्याय निवडले आहेत. शास्त्रींनी यापैकी आर अश्विनची स्पेशालिस्ट स्पिनर म्हणून निवड केली आहे, तर रवींद्र जडेजाची सहाव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी निवड केली आहे.  


खेळपट्टी कडक व ड्राय असल्यास दोन फिरकीपटूंसोबत खेळायला हवं. इंग्लंडच्या हवामानावर सर्व अवलंबून आहे. पण, भारताने तिथे दोन फिरकीपटूंसोबत खेळावे. दोन जलदगती गोलंदाज आणि एक अष्टपैलू खेळाडू. पाच स्पेशालिस्ट फलंदाज आणि एक यष्टिरक्षक जो सहाव्या फलंदाजाची भूमिका बजावेल,''असे शास्त्री म्हणाले.  

जसप्रीत बुमराह, रिषभ पंत, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर आणि सूर्यकुमार यादव यांना या सामन्याला मुकावे लागले आहे. सूर्यकुमार वगळल्यास अन्य सर्व खेळाडू दुखापतीमुळे संघाबाहेर आहेत. त्यामुळे योग्य प्लेइंग इलेव्हन भारताला विजय मिळवून देऊ शकते. 


रवी शास्त्री यांनी निवडलेली प्लेइंग इलेव्हन - रोहित शर्मा, शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, रवींद्र जडेजा. केएस भरत, शार्दूल ठाकूर, आर अश्विन, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज ( Ravi Shastri's predicted India XI - Rohit Sharma (c), Shubman Gill, Cheteshwar Pujara, Virat Kohli, Ajinkya Rahane, Ravindra Jadeja, KS Bharat (wk), Shardul Thakur, Ravichandran Ashwin, Mohammad Shami, Mohammed Siraj.)

Web Title: Ravi Shastri predicts India XI for the fast-approaching ICC World Test Championship Final

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.