Virat Kohli vs Gautam Gambir : 'यू लव्ह हिम, यू हेट हिम, यू कान्ट इग्नोर'.. विराट कोहली हे क्रिकेट जगतातील एक असे नाव आहे आणि ज्याच्याबद्दल हे म्हटले जाते. कोहलीच्या चाहत्यांना त्याचा खेळ जितका आवडतो तितकाच त्याचा आक्रमकपणाही आवडतो आणि चाहत्यांना निराश करत नाही. मैदानावरील खेळादरम्यान कोहलीची आक्रमकता अनेकदा दिसून येते. याबाबत कॉमेंट्री करणाऱ्या रवी शास्त्रींना ( Ravi Shastri) एका दर्शकाने प्रश्न विचारला की, ते टीम इंडियाचे प्रशिक्षक असताना विकेट घेतल्यावर किंवा मॅच जिंकल्यानंतर विराटला शांत राहा असे म्हटले होते का?
यावर टीम इंडियाचे माजी प्रशिक्षक म्हणाले,''पागर आहे का, अजिबात नाही. त्याने शांत का व्हावे यार! त्याला हवे तितके व्यक्त होऊ द्या. विराटचं व्यक्तिमत्त्व तसंच आहे, त्याला असंच राहू दे. तू मस्त माणूस आहेस, मस्त राहा. तो आनंदी आहे, त्याला आनंदी राहू दे."
लखनौ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील सामना खेळापेक्षा विराट व गौतम गंभीर यांच्यातल्या भांडणामुळे अधिक चर्चेत राहिला. RCBचा स्टार फलंदाज विराट कोहली आणि LSGचा वेगवान गोलंदाज नवीन-उल-हक यांच्यात जोरदार भांडण झालं. परिस्थिती इतकी बिघडली की सामना संपल्यानंतरही हा वाद संपला नाही आणि त्यानंतर विराट व मार्गदर्शक गौतम गंभीरही एकमेकांना भिडले. बीसीसीआयने काही खेळाडूंवर कारवाई केली. दोन्ही दिग्गजांना आयपीएलच्या आचारसंहितेचा भंग केल्याबद्दल त्यांच्या संपूर्ण मॅच फीचा दंड ठोठावण्यात आला आहे, तर नवीन-उल-हकला ५० टक्के दंड भरावा लागेल.