विराट कोहली ( Virat Kohli) इंडियन प्रीमिअर लीगच्या पहिल्या पर्वापासून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून ( RCB) खेळतोय... आयपीएलमध्ये एकाच संघाकडून इतकी वर्ष खेळणारा तो एकमेव खेळाडू आहे, परंतु आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विक्रमांचा पाऊस पाडणारा विराट RCB ला १६ वर्षांत एकही जेतेपद जिंकून देऊ शकलेला नाही. २००९, २०११ व २०१६ मध्ये RCB फायनलमध्ये पोहोचली खरी, परंतु जेतेपदाने त्यांना हुलकावणी दिली. आयपीएलच्या १७व्या पर्वातही बंगळुरू फ्रँचायझीची सुरुवात काही खास झालेली नाही, ४ पैकी फक्त १ सामना त्यांना जिंकता आला आहे. काल लखनौ सुपर जायंट्सने त्यांना घरच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर हार मानण्यास भाग पाडली.
आयपीएल २०२४ पूर्वी पार पडलेल्या महिला प्रीमिअऱ लीगमध्ये स्मृती मानधनाच्या नेतृत्वाखाली रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या महिला संघाने जेतेपद पटकावले. त्यामुळे आता पुरुष संघ १६ वर्षांचा दुष्काळ यंदातरी संपवतील असा चाहत्यांना विश्वास आहे. पण, काल घरच्या मैदानावरील त्यांचा पराभव पाहता, चाहत्यांच्या विश्वासाला यंदाही तडा जाईल अशी शक्यता दिसतेय. अशा परिस्थितीत RCB वर टीकाही होताना दिसतेय, मात्र भारताची माजी प्रशिक्षक रवी शास्त्री ( Ravi Shastri) विराटच्या बचावासाठी मैदानावर उतरले आहेत.
RCB साठी १८२ धावांचे लक्ष्य फार अवघड नव्हते, परंतु त्यांची २८ धावांनी हार झाली. RCB चा संपूर्ण संघ १५३ धावांत तंबूत परतला. खालच्या क्रमांकावर आलेला महिपाल लोमरोर याने १३ चेंडूंत ३३ धावांची स्फोटक खेळी करून LSG चं टेंशन वाढवले होते, परंतु RCB चे अन्य फलंदाज अपयशी ठरले. आयपीएल इतिहासात दिल्ली कॅपिटल्सनंतर ( २५) सर्वाधिक २४ वेळा ऑल आऊट होण्याचा मान काल RCB ने पटकावला आहे. या पराभवानंतर रवी शास्त्री म्हणाले, जर आयपीएल हा वैयक्तिक खेळाडूंचा खेल असता तर विराट कोहलीने सर्वाधिक ट्रॉफी जिंकल्या असत्या.
विराटने आयपीएलमध्ये सर्वाधिक ७४५५ धावा केल्या आहेत. सर्वाधिक ७ शतकं आणि एका पर्वात सर्वाधिक ९७३ धावांचा विक्रमही विराटच्या नावावर आहे. २०१६च्या पर्वात त्याने ४ शतकं ठोकली, जी आयपीएलच्या एकापर्वातील संयुक्तपणे सर्वाधिक शतकं आहेत.
Web Title: Ravi Shastri said - "If IPL was an individual game then Virat Kohli would have had the Most Trophies"
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.