33 वर्ष जुना फॉर्म्युला वापरत भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेत मिळवला विजय ?

भारतीय क्रिकेट संघाने दक्षिण आफ्रिकेत 33 वर्ष जुना फॉर्म्यूला वापरत एकदिवसीय मालिका 5-1 ने आणि टी-20 2-1 ने विजय मिळवला

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2018 12:34 PM2018-02-28T12:34:37+5:302018-02-28T12:34:37+5:30

whatsapp join usJoin us
Ravi Shastri uses 33 year old formula to win South Africa series | 33 वर्ष जुना फॉर्म्युला वापरत भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेत मिळवला विजय ?

33 वर्ष जुना फॉर्म्युला वापरत भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेत मिळवला विजय ?

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

नवी दिल्ली - भारतीय क्रिकेट संघाने दक्षिण आफ्रिकेत 33 वर्ष जुना फॉर्म्यूला वापरत एकदिवसीय मालिका 5-1 ने आणि टी-20 2-1 ने विजय मिळवला. 1985 मध्ये वापरण्यात आलेला हा फॉर्म्यूला वापरण्याचं सर्व श्रेय प्रशिक्षक रवी शास्त्री यांना जातं. ही माहिती भारतीय क्रिकेट संघाची माजी फिरकी गोलंदाज लक्ष्मण शिवरामकृष्णन यांनी दिली आहे. टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सांगितलं की, '1985 मध्ये वर्ल्ड चॅम्पिअनशिप दरम्यान आम्ही एकदिवसीय सामन्यात दोन फिरकी गोलंदाजांचा वापर करत किमान पाच विकेट घेण्याचा प्लान आखला होता. त्यावेळी हा प्लान यशस्वी ठरला होता'.

'1985 मध्ये माझ्या पहिल्या एकदिवसीय सामन्याआधी कर्णधार सुनील गावसकर यांनी मला आणि रवी शास्त्रीला लंचसाठी बोलावलं. त्यावेळी त्यांनी तुम्ही दोघांनी मिळून 20 ओव्हर्समध्ये किमान पाच विकेट्स घेतल्या पाहिजेत असं सांगितंलं. इतकंच नाही, 10 ओव्हर्समध्ये 50 धावा जरी गेल्या तरी चालेल असंही गावसकर बोलले होते. त्यांना कोणत्याही परिस्थितीत माझ्याकडून दोन ते तीन विकेट्स हवे होते. रवी शास्त्री यांना दक्षिण आफ्रिका दौ-यात हाच फॉर्म्यूला वापरला आहे', असं लक्ष्मण शिवरामकृष्णन यांनी सांगितलं आहे. 

वर्ल्ड कप-2019 संबंधी बोलताना त्यांनी म्हटलं की, 'फिंगर स्पिनर धावांची गती रोखण्यात मदत करतात. त्यांना मनगटाच्या सहाय्याने गोलंदाजी करणा-यांप्रमाणे बाऊंस मिळत नाही. माझ्या मते कुलदीप यादव आणि युजवेंद्र चहल यांना प्लेइंग इलेव्हनमध्ये ठेवण्याचा निर्णय योग्य ठरेल. दोघेही चेंडूला गती न देता टर्न देण्यात सक्षम आहेत. त्यांच्या गोलंदाजीवर फटकेबाजी करणं तितकं सोपं जाणार नाही'. 

फिंगर स्पिनर म्हणजेच आर अश्विन आणि रवींद्र जाडेजा यांच्या वनडे आणि टी-20 कमबॅकवरील प्रश्नावर बोलताना त्यांनी सांगितलं की, 'पुनरागमन करणं त्यांना सोपं जाणार नाहीये. टीम मॅनेजमेंटला हवा आहे तसा परफॉर्मन्स ते देऊ शकलेले नाहीत. त्यांच्या गोलंदाजीचा वेग जास्त असल्याने, फलंदाजांना फटकेबाजी करणं अडचणीचं ठरत नाही. जाडेजा आणि आर अश्विनच्या गोलंदाजीचा वेग ताशी 90 किमी असून कुलदीप आणि चहलचा 75  ते 80 किमी आहे'. 
 

Web Title: Ravi Shastri uses 33 year old formula to win South Africa series

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.