महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीबाबत रवी शास्त्रींचे मोठे विधान; नेमके काय म्हणाले जाणून घ्या...

भारताचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी धोनीच्या नेतृत्वाबाबत मोठे विधान केले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2019 02:44 PM2019-11-26T14:44:29+5:302019-11-26T14:44:56+5:30

whatsapp join usJoin us
Ravi Shastri's big statement about Mahendra Singh Dhoni's retirement | महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीबाबत रवी शास्त्रींचे मोठे विधान; नेमके काय म्हणाले जाणून घ्या...

महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीबाबत रवी शास्त्रींचे मोठे विधान; नेमके काय म्हणाले जाणून घ्या...

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मुंबई : भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी हा विश्वषकानंतर संघात परतलेला नाही. भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील मालिकांमध्येही धोनीला संघात स्थान देण्यात आलेले नाही. आता तर भारताचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी धोनीच्या नेतृत्वाबाबत मोठे विधान केले आहे.

Image result for ms dhoni with ravi shastri

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातल्या मालिकेतून माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करेल, असे वाटत होते. मात्र, निवड समितीनं जाहीर केलेल्या ट्वेंटी-20 आणि वन डे अशा दोन्ही संघांत धोनीचं नाव नसल्यानं सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. विंडीजविरुद्ध धोनी पुन्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सक्रीय होऊ शकतो, अशा चर्चा होत्या. पण, आता धोनी नक्की कधी मैदानावर दिसेल, याची पुन्हा एकदा उत्सुकता लागली आहे.

Image result for ms dhoni with ravi shastri

धोनीबाबत शास्त्री म्हणाले की, " धोनी खेळायला कधी सुरुवात करतो, यावर सारे काही अवलंबून असेल. कारण येत्या काही महिन्यांमध्ये आयपीएल होणार आहे. या आयपीएलमध्ये धोनी कशी कामगिरी करतो आणि त्याचबोरबर अन्य यष्टीरक्षक कशी कामगिरी करता, याकडे सर्वांचे लक्ष असेल. कारण यंदाच्या आयपीएलनंतर विश्वचषकासाठीचा पंधरा सदस्यीय खेळाडूंची निवड  करण्यात येणार आहे. त्यामुळे आयपीएलनंतर सर्व चित्र स्पष्ट होणार आहे." 

महेंद्रसिंग धोनी मार्च 2020मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये परतणार, पण टीम इंडियाकडून नाही खेळणार?
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातल्या मालिकेतून माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करेल, असे वाटत होते. मात्र, निवड समितीनं जाहीर केलेल्या ट्वेंटी-20 आणि वन डे अशा दोन्ही संघांत धोनीचं नाव नसल्यानं सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. विंडीजविरुद्ध धोनी पुन्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सक्रीय होऊ शकतो, अशा चर्चा होत्या. पण, आता धोनी नक्की कधी मैदानावर दिसेल, याची पुन्हा एकदा उत्सुकता लागली आहे. ताज्या माहितीनुसार धोनी मार्च 2020मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कमबॅक करेल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. पण, धोनीचं हे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पदार्पण टीम इंडियाकडून नसेल, अशी माहिती मिळत आहे.
वन डे वर्ल्ड कप स्पर्धेनंतर धोनीनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून विश्रांती घेतली आहे. या कालावधीत त्याला वेस्ट इंडिज, दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेशविरुद्धच्या मालिकेत खेळता आले नाही. त्यात विंडीजविरुद्धच्या मालिकेतही त्याचा टीम इंडियात समावेश करण्यात आलेला नाही. विंडीज मालिकेनंतर ऑस्ट्रेलिया, श्रीलंका हे संघ भारत दौऱ्यावर येणार आहेत. त्यानंतर टीम इंडिया न्यूझीलंड दौऱ्यावर रवाना होणार आहे. या तीनही मालिकेत धोनीचा संघात समावेश नसेल. इंडियन प्रीमिअर लीगच्या हंगामापूर्वी धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये परतणार आहे. बांगलादेश येथे होणाऱ्या आशियाई एकादश आणि जागतिक संघ यांच्यात दोन ट्वेंटी-20 सामने होणार आहेत. या दोन्ही सामन्यांना आंतरराष्ट्रीय दर्जा आहे आणि यात धोनी आशियाई संघाचे प्रतिनिधित्व करण्याची शक्यता आहे.  18 आणि 21 मार्च या तारखेला हे सामने होणार आहेत. 
या सामन्यांसाठी धोनीसह विराट कोहली, रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्या, भुवनेश्वर कुमार आणि रवींद्र जडेजा यांना आशियाई एकादश संघाचे प्रतिनिधित्व करण्याची परवानगी द्यावी अशी विनंती बांगलादेश क्रिकेट मंडळानं भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडे केली होती.  याच कालावधीत दक्षिण आफ्रिकेचा संघ भारत दौऱ्यावर येणार आहे आणि 18 मार्चला कोलकाता येथे वन डे सामना खेळवण्यात येणार आहे. त्यामुळे विराट, बुमराह, पांड्या, भुवी, रोहित यांची आशियाई एकादश संघाकडून खेळण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे बीसीसीआय कदाचित धोनीला या सामन्यात खेळण्याची परवानगी देऊ शकते. 
 

Web Title: Ravi Shastri's big statement about Mahendra Singh Dhoni's retirement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.