जमैका : भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी रवी शास्त्री यांचीच फेरनिवड झाली. कपिल देव यांच्या अध्यक्षतेखालील त्रिसदस्यीय संघाने शास्त्रींच्या नावावर शिक्कामोर्तब केले. मुख्य प्रशिक्षकपदाच्या आणखी एका टर्म मिळालेल्या शास्त्री यांनी फ्युचर प्लान सांगितले आहे. कसोटी आणि वन डे क्रिकेटमध्ये टीम इंडिया सातत्यपूर्ण कामगिरी करत आहे आणि आगामी ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धा डोळ्यासमोर ठेवून खेळाडूंनी ट्वेंटी-20तही हाच फॉर्म कायम राखावा, अशी अपेक्षा शास्त्रींनी व्यक्त केली आहे.
आयसीसी कसोटी क्रमवारीत भारतीय संघ अव्वल स्थानावर आहे, तर वन डेतही दुसऱ्या स्थानी आहे. टीम इंडियाने मागील 15 कसोटी मालिकांपैकी 12 मालिका जिंकल्या आहेत. वन डेतही भारताने 2018च्या आशिया चषक उंचावला, तर 2019च्या वर्ल्ड कप स्पर्धेत उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली आहे. या दोन फॉरमॅटप्रमाणे संघाने आता ट्वेंटी-20वरही लक्ष केंद्रीत करावे असे शास्त्री यांना वाटते. टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना त्यांनी सांगितले की,''हा युवा संघ दमदार कामगिरी करण्याची धमक राखतो. जगातील सर्वोत्तम संघ बनण्याचा क्षमता त्यांच्यात आहे. कसोटीत अव्वल स्थान, वन डेत दुसरे स्थान. ट्वेंटी-20त आम्ही चौथ्या स्थानावर आहोत, कारण या फॉरमॅटमध्ये आम्ही अधिक सामने खेळलेले नाहीत. त्यादृष्टीनं काम सुरू करायला हवे आणि बराच पल्ला गाठायचा आहे.''
16 ऑगस्टला झालेल्या प्रशिक्षकपदाच्या मुलाखतीनंतर 57 वर्षीय शास्त्रींची फेरनियुक्ती करण्यात आली. नोव्हेंबर 2021पर्यंत त्यांचा कार्यकाळ असणार आहे. या कालावधीत शास्त्री यांच्यासमोर जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा, दोन ट्वेंटी-20 वर्ल्ड कप आणि अनेक होम-अवे मालिका आहेत. ते म्हणाले,''पुढील दोन वर्षांत आम्हाला दोन ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धा खेळायच्या आहेत. शिवाय कसोटी अजिंक्यपद स्पर्धाही सुरू झाली आहे. त्यामुळे ते आमचे मुख्य प्राधान्य आहे. पण, ट्वेंटी- 20 क्रिकेटमध्ये आम्हाला नव्या दृष्टीकोनातून विचार करायला हवा आणि प्रतिभावान खेळाडूंचा योग्य वापर करून घ्यायला हवा.''
18 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर 2020 या कालावधीत ट्वेंटी-20 स्पर्धा होणार आहे, तर 2021मध्ये भारतात ही स्पर्धा होईल. या दोन्ही स्पर्धेत भारतीय संघाची कामगिरी उल्लेखनीय होईल, असा विश्वास शास्त्रींनी व्यक्त केला. ते म्हणाले,''वन डे आणि ट्वेंटी-20 क्रिकेट यात बराच फरक आहे. दोन्ही फॉरमॅटला एकाच दृष्टीकोनातून पाहू शकत नाही. त्यामुळे आम्ही त्यादृष्टीनं तयारी करणार आहोत.''
पारदर्शक निवड प्रक्रिया दीर्घकाळासाठी महत्त्वाची
Breaking: विराट कोहलीला 'देव' पावले; पुन्हा रवी शास्त्रीच टीम इंडियाचे 'महागुरू'
रवी शास्त्रींचं प्रशिक्षकपद थोडक्यात बचावलं; 'टफ फाईट' कुणी दिली हे वाचून चकित व्हाल!
Video : प्रशिक्षकपदी पुन्हा निवड झाल्यानंतर रवी शास्त्री यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
रवी शास्त्रींनी मुलाखतीत सल्लागार समितीकडे केली महत्त्वाची मागणी