Join us  

रविचंद्रन अश्विन घेऊ शकतो ८०० बळी

मुरलीधरनच्या नावावर कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक ८०० बळी आहेत तर शेन वॉर्न (७०८) दुसऱ्या आणि अनिल कुंबळे (६१९) तिसऱ्या स्थानी आहेत. मुरलीधरनने वॉर्न, कुंबळे, सकलेन मुश्ताक, मुश्ताक अहमद व त्यानंतर हरभजन सिंगच्या काळात क्रिकेट खेळले

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2021 1:00 AM

Open in App

सिडनी : सध्याच्या पिढीतील फिरकीपटूंमध्ये केवळ रविचंद्रन अश्विनच ७००-८०० बळींच्या टप्प्यापर्यंत पोहचू शकतो आणि ऑस्ट्रेलियाचा नॅथन लियोन तेथपर्यंत पोहोचण्यास सक्षम नाही, असे मत महान फिरकीपटू मुथय्या मुरलीधरनने व्यक्त केले.

मुरलीधरनच्या नावावर कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक ८०० बळी आहेत तर शेन वॉर्न (७०८) दुसऱ्या आणि अनिल कुंबळे (६१९) तिसऱ्या स्थानी आहेत. मुरलीधरनने वॉर्न, कुंबळे, सकलेन मुश्ताक, मुश्ताक अहमद व त्यानंतर हरभजन सिंगच्या काळात क्रिकेट खेळले. मुरलीधरन म्हणाला, ‘त्यावेळी फिरकीपटूंना खेळपट्टीवर बरीच मेहनत घ्यावी लागत होती. त्यामुळे नव्या चेंडूंचा शोध घेण्यावर मेहनत घ्यावी लागत होती. आता टी-२० आल्यामुळे विविधतेमध्ये बदल झाला आहे. ’ मुरलीधरन डीआरएस आल्यानंतर केवळ एक मालिका २००८ मध्ये भारताविरुद्ध खेळली. त्याच्या मते त्यावेळी जर हे तंत्र असते तर त्याच्या बळींची संख्या अधिक असती. कारण त्यावेळी फलंदाजांनी पॅडचा वापर एवढ्या सहजपणे केला नसता आणि त्याचा लाभ झाला असता.’

लियोनमध्ये ती क्षमता नाहीnमुरलीधरन मायकल  वॉनच्या कॉलममध्ये म्हणाला,‘अश्विनकडे तशी संधी आहे. कारण तो शानदार फिरकीपटू आहे. त्याच्या व्यतिरिक्त अन्य दुसरा गोलंदाज ८०० पर्यंत पोहचू शकत नाही. नॅथन लियोनमध्ये ती क्षमता नाही. तो ४०० विकेटच्या उंबरठ्यावर आहे, पण तेथेपर्यंत पोहचण्यासाठी त्याला बरेच सामने खेळावे लागतील. nअश्विनने ७४ कसोटी सामन्यात ३७७ बळी घेतले आहेत तर लियोनने ९९ कसोटी सामन्यात ३९६ बळी घेतले आहेत.nताे पुढे म्हणाला,‘टी-२० व वन-डे क्रिकेटमध्ये सर्वकाही बदलले आहे. ज्यावेळी मी खेळत होतो त्यावेळी फलंदाजांकडे तंत्र होते व खेळपट्ट्या पाटा असायच्या. आता तर तीन दिवसात कसोटी सामने संपत आहेत. माझ्या काळात गोलंदाजीमध्ये अतिरिक्त प्रयत्न करावे लागत होते. nआजच्या काळात दिशा व टप्पा अचूक राखला तर पाच विकेट मिळतात. कारण आक्रमक खेळण्याच्या प्रयत्नात फलंदाज अधिक काळ टिकाव धरू शकत नाही.’

 

टॅग्स :आर अश्विनभारतीय क्रिकेट संघ