R Ashwin On Rohit Sharma And Virat Kohli: भारताचा वरिष्ठ ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विन ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत टीम इंडियाचा भाग आहे. आर अश्विनने नुकतेच त्याच्या यूट्यूब चॅनलवर टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहलीबद्दल मोठे विधान केले आहे. त्याने या दोन धडाकेबाज खेळाडूंच्या चाहत्यांना संयम बाळगण्यास सांगितले आहे.
अश्विनने चाहत्यांना ICC ट्रॉफी जिंकण्याच्या प्रयत्नात स्टार फलंदाज रोहित आणि विराट यांच्यासोबत संयम बाळगण्याचे आवाहन केले. महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरलाही सहा प्रयत्नांनंतर वर्ल्ड कप जिंकता आला होता, असे त्याने म्हटले आहे. भारतीय संघाने २०११ मध्ये शेवटचा वर्ल्ड कप जिंकला होता आणि २०१३च्या चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर भारतीय संघाला आयसीसी स्पर्धेत यश मिळालेले नाही.
रोहित व विराट यांचे समर्थन करताना अश्विनने त्याच्या यूट्यूब चॅनलवर म्हटले, ''तुम्ही ही स्पर्धा जिंकली नाही आणि ती जिंकली नाही, हे सांगणे खूप सोपे आहे. महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर १९२२, १९९६, १९९९, २००३ आणि २००७ वर्ल्ड कप खेळला. अखेर २०११ मध्ये त्याला वर्ल्ड कप जिंकता आला. त्याला ही ट्रॉफी जिंकण्यासाठी सहा वर्ल्ड कपपर्यंत वाट पाहावी लागली.''
अश्विन म्हणाला, ''दुसरा महान खेळाडू महेंद्रसिंग धोनी याने येताच वर्ल्ड कप जिंकला, याचा अर्थ असा नाही की प्रत्येकाच्या बाबतीत असे होईल. रोहित शर्मा व विराट कोहली २००७ मध्ये खेळले नव्हते. रोहित शर्मा २०११ च्या वर्ल्ड कप स्पर्धेत खेळू शकला नव्हता. कोहली २०११, २०१५ व २०१९ मध्ये खेळला आहे आणि आता तो २०२३ मध्ये चौथा वर्ल्ड कप खेळणार आहे.''
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"