बांगलादेश विरुद्धच्या चेन्नई कसोटी सामन्यात अष्टपैलू आर. अश्विन याने टीम इंडियाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. पहिल्या डावातील शतकी खेळीनंतर दुसऱ्या डावात त्याने ६ विकेट्स घेतल्याचे पाहायला मिळाले. या कामगिरीमुळे अश्विनला सामनावीर पुरस्कारही मिळाला. घरच्या मैदानावर खेळणाऱ्या लोकल बॉयला चीअर करण्यासाठी फॅमिली मेंबर्संनीही स्टेडिमयवर हजेरी लावली होती. पत्नी प्रीती नारायणन आणि दोन मुलींची स्टेडियमवरील झलक हा देखील एक चर्चेचा विषय ठरला. यात सामन्यानंतर पत्नी प्रीतीनं फिरकीपटू अश्विनची घेतलेली मुलाखतही आता चर्चेत आहे.
अन् बायकोनं घेतली अश्विनची फिरकी!
बीसीसीआयने प्रीती नारायन आणि आर अश्विन यांचा एक खास व्हिडिओ सोशल मीडिया अकाउंटवरून शेअर केला आहे. या व्हिडिओत प्रीती बांगलादेशच्या संघाला पुरुन उरलेल्या अश्विनची मजेशीर अंदाजात फिरकी घेताना दिसते. "पहिल्या दिवशी तू आम्हाला का भेटला नाहीस?" असा प्रश्न उपस्थितीत करून ती अश्विनला जाब विचारताना दिसते.
मुलींसाठी स्पेशल गिफ्टचं काय?
प्रीतीनं चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवरील सामन्यानंतर अश्विनचा जी खास मुलाखत घेतली त्यात तिने डॉटर्स डे ला मुलींना काय गिफ्ट देणार आहेस? असा प्रश्नही विचारल्याचे पाहायला मिळाले. यावर अश्विननं त्यांना पाच विकेट्स घेतलेला तो चेंडू गिफ्ट करणार असल्याचे सांगितले.
'इथूनं' मिळालेल्या ऊर्जेचा काही फायदा? दोघांच्यातील केमिस्ट्री दाखवणारा प्रीतीचा प्रतिप्रश्न
चेपॉकच्या घरच्या मैदानात बांगलादेश विरुद्धच्या सामन्यात अश्विनच्या भात्यातून दुसरं शतक निघालं. या मैदानातील खास कामगिरीबद्दल काय सांगशील, अशा प्रश्नही प्रीतीनं अश्विनला विचारला होता. यावर तो म्हणाला की, चेपॉक स्टेडियम खेळताना एक वेगळीच एनर्जी मिळते. जी प्रेरित करते. ही गोष्ट मी शब्दांत व्यक्त करू शकत नाही. या मैदानात खेळणं नेहमीच खास अनुभव असतो, असे अश्विन म्हणाला. नवरोबाच्या रिप्लायवरही प्रीती स्वत:ता उल्लेख करत इथूनं आलेल्या ऊर्जेचा काही फायदा मिळाला का? असा प्रतिप्रश्नही करतानाही दिसते. सवाल जवाबाचा हा मजेशीर अंदाज दोघांच्यातील खास केमिस्ट्रीची झलक दाखवून देणारा होता. हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होताना दिसतोय.
Web Title: Ravichandran Ashwin Interviewed By Wife Prithi Narayanan After Chennai Test
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.