अश्विनला कसोटीपटू पुरस्कारासाठी नामांकन,  विजेत्याच्या नावाची घोषणा २४ जानेवारीला

Ravichandran Ashwin : चेन्नईच्या ३५ वर्षांच्या या गोलंदाजाने यंदा आठ सामन्यांत १६.२३ च्या सरासरीने ५२ गडी बाद केले. फलंदाजीत त्याने एका शतकी खेळीसह २८.०८ च्या सरासरीने ३३७ धावा केल्या आहेत. 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2021 05:37 AM2021-12-29T05:37:27+5:302021-12-29T05:37:48+5:30

whatsapp join usJoin us
Ravichandran Ashwin nominated for Test award, winner announced on January 24 | अश्विनला कसोटीपटू पुरस्कारासाठी नामांकन,  विजेत्याच्या नावाची घोषणा २४ जानेवारीला

अश्विनला कसोटीपटू पुरस्कारासाठी नामांकन,  विजेत्याच्या नावाची घोषणा २४ जानेवारीला

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

दुबई : भारताचा अनुभवी ऑफ स्पिनर रविचंद्रन अश्विन याला मंगळवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने यंदाच्या सर्वोत्कृष्ट कसोटीपटूंसाठी चार खेळाडूंमध्ये नामांकन लाभले आहे. 
चेन्नईच्या ३५ वर्षांच्या या गोलंदाजाने यंदा आठ सामन्यांत १६.२३ च्या सरासरीने ५२ गडी बाद केले. फलंदाजीत त्याने एका शतकी खेळीसह २८.०८ च्या सरासरीने ३३७ धावा केल्या आहेत. 
अश्विनशिवाय इंग्लंडचा कर्णधार जो रुट, न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज काइल जेमिसन आणि श्रीलंकेचा सलामीवीर दिमुथ करुणारत्ने यांना मानांकन मिळाले. विजेत्याच्या नावाची घोषणा २४ जानेवारी रोजी केली जाईल. आयसीसीने म्हटले आहे की, अश्विनसारख्या मॅचविनरने  २०२१ ला जगातील महान फिरकी गोलंदाज म्हणून दरारा निर्माण केला. सिडनीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध १२९ चेंडूंत संयमी २९ धावांची खेळी करीत मालिका बरोबरीत सोडविण्यात मोलाचे योगदान दिले. 

Web Title: Ravichandran Ashwin nominated for Test award, winner announced on January 24

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.