India vs Bangladesh, 1st Test : ज्या चेपॉकच्या मैदानात भारतीय संघातील आघाडीच्या फलंदाजांनी नांगी टाकली तिथं आर अश्विन आणि रवींद्र जडेजा ही जोडी चांगलीच जमली. गोलंदाजीत ताळमेळ दाखवणाऱ्या या जोड गोळीनं फलंदाजीत कमालीची कामगिरी करुन दाखवत संघाला संकटाच्या खाईत बाहेर काढणारी कामगिरी करून दाखवली. आर. अश्विन याने आपल्या घरच्या मैदानात गोलंदाजीला येण्याआधी फलंदाजीत हात साफ केला. वडिल अन् फॅमिलीतील अन्य सदस्यांनी त्याच्या या खेळीचा आनंद घेतला. त्या खास सीनचे फोटोही सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहेत.
कसोटी कारकिर्दीतील दुसरे सर्वात जलद अर्धशतक
बांगलादेश विरुद्धच्या सामन्यात आर. अश्विन याने ५८ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. त्याच्या कसोटी कारकिर्दीतील हे दुसरे जलद अर्धशतक ठरले. याआधी अश्विनने २०१२ मध्ये में सिडनीच्या मैदानात ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी सामन्यात ५६ चेंडूत अर्धशतक झळकावले होते. कसोटीतील त्याचे हे सर्वात जलद अर्धशतक आहे.
"पापा कहते हैं, बड़ा नाम करेगा बेटा हमारा ऐसा काम करेगा"
१५० + भागीदारीसह टीम इंडियाची धावसंख्या ३०० पार
बांगलादेश विरुद्धच्या सामन्यात आर अश्विन याने रवींद्र जडेजाच्या साथीनं मोठी भागीदारी करत संघाला सुस्थितीत आणले. केएल राहुलची विकेट पडल्यावर अश्विन जड्डूला जॉईन झाला. तो मैदानात आला त्यावेळी भारतीय संघाने १४४ धावांवर सहावी विकेट्स गमावली होती. इथून पुढे दोघांनी १५० पेक्षा अधिक धावांची भागीदारी रचत संघाची धावसंख्या ३०० पार नेली.