Ravindra Jadeja-Shikhar Dhawan: दुखापतग्रस्त रवींद्र जडेजा म्हणतोय शिखर धवनचे लग्न करून द्या, 'गब्बर'ने धरला ठेका, VIDEO

भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा टी-20 विश्वचषकातून बाहेर झाला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2022 02:58 PM2022-09-25T14:58:59+5:302022-09-25T15:01:28+5:30

whatsapp join usJoin us
Ravindra Jadeja and Shikhar Dhawan's funny reel video is going viral in a big way | Ravindra Jadeja-Shikhar Dhawan: दुखापतग्रस्त रवींद्र जडेजा म्हणतोय शिखर धवनचे लग्न करून द्या, 'गब्बर'ने धरला ठेका, VIDEO

Ravindra Jadeja-Shikhar Dhawan: दुखापतग्रस्त रवींद्र जडेजा म्हणतोय शिखर धवनचे लग्न करून द्या, 'गब्बर'ने धरला ठेका, VIDEO

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

नवी दिल्ली : भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) दुखापतीमुळे आगामी टी-20 विश्वचषकातून (T20 World Cup 2022) बाहेर झाला आहे. शस्त्रक्रियेनंतर रवींद्र जडेजा सध्या रिकव्हरी मोडमध्ये आहे. एनसीएमध्ये रवींद्र जडेजाची रिकव्हरी सुरू आहे, यासोबतच मस्ती देखील सुरू आहे. रवींद्र जडेजासोबत भारतीय संघाचा सलामीवीर शिखर धवन (Shikhar Dhawan) देखील मस्ती करत आहे. 

शिखर धवन आणि रवींद्र जडेजा यांनी सोबत एक व्हिडीओ पोस्ट केला आहे, जी एक मजेशीर रिल आहे. यामध्ये रवींद्र जडेजा म्हणतो धवनला म्हणतो की, याचे लग्न करून द्या, काही जबाबदारी येईल, सुधारणा होईल. ज्यानंतर शिखर धवन खूप डान्स करायला लागतो. शिखर धवन आणि रवींद्र जडेजा यांची ही मजेशीर रील इस्टाग्रामवर चांगलीच व्हायरल होत आहे. भारतीय संघातील अनेक स्टार खेळाडूंनी यावर मजेशीर कमेंट्स केल्या आहेत. 

दुखापतीमुळे जडेजा विश्वचषकातून बाहेर
रवींद्र जडेजा आशिया चषकात भारतीय संघाचा हिस्सा होता, मात्र तिथे त्याच्या गुडघ्याला दुखापत झाली. त्यामुळे आगामी टी-20 विश्वचषकाच्या संघातून जडेजाला वगळण्यात आले आहे. रवींद्र जडेजावर नुकतीच शस्त्रक्रिया करण्यात आली आहे, आता त्याला मोठ्या कालावधीसाठी विश्रांती देण्याचा सल्ला दिला आहे. रवींद्र जडेजा टी-20 विश्वचषकातून बाहेर झाल्यामुळे भारतीय संघाला मोठा झटका बसला आहे. 

टी-20 विश्वचषकासाठी भारतीय संघ 
रोहित शर्मा (कर्णधार), के.एल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, हार्दिक पांड्या, रिषभ पंत, दिनेश कार्तिक, आर अश्विन, जसप्रीत बुमराह, युजवेंद्र चहल,  भुवनेश्वर कुमार,  हर्षल पटेल, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग.

राखीव खेळाडू - मोहम्मद शमी, श्रेयस अय्यर, रवी बिश्नोई, दीपक चहर. 

भारतीय संघाचे वर्ल्ड कप स्पर्धेतील वेळापत्रक
23 ऑक्टोबर - भारत वि. पाकिस्तान, 1.30 वाजल्यापासून, मेलबर्न
27 ऑक्टोबर - भारत वि. A गटातील उपविजेता, 12.30 वाजल्यापासून, सिडनी
30 ऑक्टोबर - भारत वि. दक्षिण आफ्रिका, 4.30 वाजल्यापासून, पर्थ
2 नोव्हेंबर - भारत. वि. बांगलादेश, 1.30 वाजल्यापासून, एडलेड
6 नोव्हेंबर - भारत वि. B गटातील विजेता, 1.30 वाजल्यापासून, मेलबर्न
13 नोव्हेंबरला अंतिम सामना 

 

Web Title: Ravindra Jadeja and Shikhar Dhawan's funny reel video is going viral in a big way

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.