Join us  

Ravindra Jadeja: भारतीय संघाला मोठा झटका; ऑलराउंडर रवींद्र जडेजा वर्ल्ड कपमधून बाहेर..?

T20 World Cup: ऑस्ट्रेलियामध्ये येत्या 16 ऑक्टोबरपासून विश्वचषकाची सुरुवात होत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2022 3:07 PM

Open in App

T20 World Cup: ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या T20 विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा या आठवड्यात होऊ शकते. याआधी टीम इंडियासाठी एक वाईट आणि एक चांगली बातमी समोर आली आहे. चांगली बातमी म्हणजे जखमी जसप्रीत बुमराह आणि हर्षल पटेल यांनी फिटनेस चाचणी पास केली आहे. त्यांचा भारतीय संघात समावेश केला जाऊ शकतो. आणि वाईट बातमी म्हणजे, अष्टपैलू रवींद्र जडेजा या वर्ल्ड कपमधून बाहेर पडला आहे.

इनसाइडस्पोर्टच्या रिपोर्टमध्ये ही माहिती देण्यात आली आहे. या रिपोर्टनुसार, रवींद्र जडेजाच्या उजव्या गुडघ्याला दुखापत झाली होती, त्यावर यशस्वी ऑपरेशन झाले आहे. या शस्त्रक्रियेमुळे जडेजा टी-20 विश्वचषकापर्यंत ठीक होण्याची शक्यता नगण्य आहे. अशा स्थितीत तो स्पर्धेतून बाहेर पडला आहे.

जडेजाने शस्त्रक्रियेची माहिती दिली

काही दिवसांपूर्वी जडेजानेही त्याचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले होते. यात त्याने त्याच्यावर झालेल्या शस्त्रक्रियेची माहिती दिली. लवकरात लवकर मैदानात परतण्याचा प्रयत्न करणार असल्याचे जडेजाने सांगितले. जडेजाने फोटोसोबत कॅप्शनमध्ये लिहिले की, 'शस्त्रक्रिया यशस्वी झाली. अनेकांनी पाठिंबा दिला, मी तुमचा आभारी आहे. लवकरच मी मैदानात परतण्याचा प्रयत्न करेन. शुभेच्छांबद्दल सर्वांचे आभार.'

यापैकी एकाची निवड होऊ शकतेअक्षर पटेल : जडेजाऐवजी फिरकीपटू अक्षर पटेलला पहिली पसंती दिली जाऊ शकते. अक्षर याआधी 2015 चा विश्वचषकही खेळला होता.वॉशिंग्टन सुंदर : हा स्टार फिरकी अष्टपैलू खेळाडूही दुखापतींमुळे बराच काळ संघाबाहेर होता. आशिया चषकापूर्वी तो झिम्बाब्वेचा दौरा करणार होता, परंतु इंग्लंडमध्ये रॉयल लंडन वनडे चषक खेळताना झालेल्या दुखापतीमुळे तो पुन्हा एकदा मालिकेतून बाहेर पडला. शाहबाज अहमद: शाहबाजची शक्यता कमी आहे, कारण त्याने अद्याप आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. झिम्बाब्वे दौऱ्यासाठी अष्टपैलू शाहबाजचा संघात समावेश करण्यात आला होता, मात्र त्याला पदार्पणाची संधी मिळाली नाही. मात्र, शाहबाजने आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी केली आहे.

टॅग्स :रवींद्र जडेजाविश्वचषक ट्वेन्टी-२०भारतीय क्रिकेट संघ
Open in App