केपटाऊन - भारतीय संघाच्या दक्षिण आफ्रिका दौºयात पहिली कसोटी सुरू होण्याआधीच भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. शुक्रवारपासून सुरू होत असलेल्या पहिल्या कसोटीपूर्वी भारतीय संघाचा महत्त्वाचा फिरकीपटू रवींद्र जडेजा याला रुग्णालयात हलविण्यात आले आहे. बीसीसीआयमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, व्हायरलमुळे गेल्या दोन दिवसांपासून रवींद्र जडेजाला त्रास जाणवत होता. खबरदारीचा उपाय म्हणून त्याला भरती करण्यात आले.
स्थानिक डॉक्टरांच्या मदतीने बीसीसीआयचे वैद्यकीय पथक जडेजाच्या तब्येतीवर लक्ष ठेवून आहे. पुढील ४८ तासांत जडेजाच्या प्रकृतीत सुधारणा होईल, असा अंदाज स्थानिक डॉक्टरांनी व्यक्त केला. पहिल्या कसोटीसाठी जडेजाचा संघात समावेश करायचा की नाही, याचा निर्णय अखेरच्या दिवशी घेण्यात येईल.
याआधी सलामीवीर शिखर धवन याच्या पायाच्या घोट्याला दुखापत झाली होती, तथापि तो फिट असल्याचे संघव्यवस्थापनाचे म्हणणे आहे. तो मुरली विजयसोबत डावाला सुरुवात करेल. दुखापतीमुळे पहिल्या कसोटीतून माघार घ्यावी लागल्यास शिखर धवनच्या जागी लोकेश राहुलला भारतीय संघात सलामीच्या जागेवर खेळविण्याची तयारी करण्यात आली होती. भारताने तीन वगवान गोलंदाज आणि एका फिरकीपटूसह खेळण्याचा निर्णय घेतल्यास रविचंद्रन आश्विन याला जडेजाऐवजी संधी मिळू शकते. (वृत्तसंस्था)
Web Title: Ravindra Jadeja Hospital, India push ahead of first Test
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.