टी-20 वर्ल्ड कपमध्ये 'हा' ऑलराउंडर घेऊ शकतो रविंद्र जडेजाची जागा! रोहित-द्रविडच्याही आहे पसंतीचा

...यामुळे आता हा खेळाडू टी-20 विश्वचषकातही रवींद्र जडेजाची जागा घेण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2022 03:37 PM2022-08-04T15:37:41+5:302022-08-04T15:38:46+5:30

whatsapp join usJoin us
ravindra jadeja may replace by deepak hooda in the T20 World Cup Rohit Dravid's favorite too | टी-20 वर्ल्ड कपमध्ये 'हा' ऑलराउंडर घेऊ शकतो रविंद्र जडेजाची जागा! रोहित-द्रविडच्याही आहे पसंतीचा

टी-20 वर्ल्ड कपमध्ये 'हा' ऑलराउंडर घेऊ शकतो रविंद्र जडेजाची जागा! रोहित-द्रविडच्याही आहे पसंतीचा

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

भारतीय क्रिकेट संघातील स्टार क्रिकेटर रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) हा टी-ट्वेंटी आणि वनडे सामन्यांतील एक उत्तम खेळाडू म्हणून ओळखला जातो. जडेजा फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणातही संघात अगदी परफेक्ट बसतो. मात्र, असे असतानाही कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) त्याला तिसऱ्या टी-२० सामन्यासाठी प्लेइंग इलेव्हनमधून बाहेरचा रस्ता दाखवला. जडेजाच्या एवजी एका धडाकेबाज खेळाडूला संधी देण्यात आली. या खेळाडूच्या खेळाने सर्वांनाच प्रभावित केले आहे. यामुळे आता हा खेळाडू टी-20 विश्वचषकातही रवींद्र जडेजाची जागा घेण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

हा खेळाडू घेऊ शकतो जडेजाची जागा - 
या खेळाडूचे नाव आहे दीपक हुडा. दीपक हा रवींद्र जडेजाप्रमाणेच गोलंदाजी आणि फलंदाजीही करू शकतो. दीपक हा काही चेंडूंतच सामन्याची दिशा बदलण्यातही तरबेज आहे. महत्वाचे म्हणाजे, तो कुठल्याही गोलंदाजाला फोडून काढू शकतो. तो सुरुवातीला टीकून खेळतो. मात्र, एकदा खेळपट्टीवर सेट झाल्यानंतर तो मोठी खेळीही खेळू शकतो. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे, दीपक कुठल्याही क्रमांकावर फलंदाजी करू शकतो.

टी-20 वर्ल्ड कपसाठीचा मोठा दावेदार - 
दीपक हुडा (Deepak Hooda) हा टी-20 वर्ल्ड कपसाठीचा मोठा दावेदार असल्याचे मानले जात आहे. तो कर्णधार रोहित शर्मा आणि प्रशिक्षक राहुल द्रविडच्याही (Rahul Dravid) पसंतीचा आहे. हुडाने आयपीएल 2022 मध्ये आपल्या खेळाने सर्वांची मने जिंकली होती. लखनै सुपर जायंट्सकडून त्याने अनेक मॅच विनिंग खेळी केली आहे. 

Web Title: ravindra jadeja may replace by deepak hooda in the T20 World Cup Rohit Dravid's favorite too

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.