रवींद्र जडेजाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध संघात स्थान, पण BCCI ने ठेवली एक मोठी अट

दुखापतीमुळे संघातून बाहेर असलेला अष्टपैलू रवींद्र जडेजा टीम इंडियात परतला आहे, पण त्याच्यासमोर एक मोठी अट ठेवण्यात आली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2023 09:01 PM2023-01-14T21:01:23+5:302023-01-14T21:01:31+5:30

whatsapp join usJoin us
Ravindra Jadeja named in the squad for the series against Australia, but the BCCI made a big condition | रवींद्र जडेजाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध संघात स्थान, पण BCCI ने ठेवली एक मोठी अट

रवींद्र जडेजाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध संघात स्थान, पण BCCI ने ठेवली एक मोठी अट

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Ravindra Jadeja: दुखापतीमुळे भारतीय क्रिकेट संघातून बाहेर असलेला अष्टपैलू रवींद्र जडेजा टीम इंडियात परतला आहे. न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या आगामी मालिकेसाठी निवड समितीने शुक्रवारी संघाची घोषणा केली. भारताला न्यूझीलंडविरुद्ध एकदिवसीय आणि टी-20 मालिका खेळायची आहे, तर ऑस्ट्रेलियाविरोधात कसोटी आणि नंतर एकदिवसीय मालिका खेळली जाईल. जडेजाने कसोटी संघात पुनरागमन केले असले तरी त्याच्याविरुद्ध सामना खेळण्यापूर्वी बीसीसीआयने एक अट घातली आहे.

भारतीय क्रिकेट संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा गेल्या 5 महिन्यांपासून मैदानाबाहेर आहे. आशिया चषकादरम्यान दुखापत झाल्यानंतर त्याने संघात पुनरागमन केले होते, परंतु पूर्ण तंदुरुस्त नसल्यामुळे त्याला पुन्हा वगळण्यात आले. बांगलादेश दौऱ्यातून बाहेर पडल्यानंतर आता त्याचे नाव ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांसाठी निवडण्यात आलेल्या संघात समाविष्ट करण्यात आले आहे. निवडकर्त्यांनी जडेजाच्या नावासोबत फिटनेसचा मुद्दा उपस्थित केला आहे. म्हणजेच त्याने फिटनेस गाठली, तरच त्याला संघात स्थान मिळेल.

बीसीसीआयने जडेजासमोर एक अट ठेवली
टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, बीसीसीआयने जडेजाला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या नागपूर कसोटीपूर्वी किमान एक देशांतर्गत सामना खेळण्यास सांगितले आहे. सामन्यात तो तंदुरुस्त राहिल्यानंतरच त्याला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी सामन्याच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान दिले जाईल.

भारत ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेचे वेळापत्रक
पहिली कसोटी, 9-13 फेब्रुवारी, नागपूर
दुसरी कसोटी, 17-21 फेब्रुवारी, दिल्ली
तिसरी कसोटी, 1-5 मार्च, धर्मशाला
चौथी कसोटी, 9-13 मार्च, अहमदाबाद

भारत-ऑस्ट्रेलिया वनडे मालिकेचे वेळापत्रक

पहिली वनडे, 17 मार्च, मुंबई
दुसरी वनडे, 19 मार्च, विशाखापट्टणम
तिसरी वनडे, 22 मार्च, चेन्नई
 

Web Title: Ravindra Jadeja named in the squad for the series against Australia, but the BCCI made a big condition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.