नवी दिल्ली, दि. 8 - रविंद्र जडेजाने आयसीसीच्या अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत प्रथम क्रमांक पटकावला आहे. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या आयसीसीच्या कसोटी अष्टपैलूंच्या क्रमवारीत जडेजानं बांगलादेशच्या शकिब अल हसनला पिछाडीवर टाकून प्रथम क्रमांकावर कब्जा केला आहे. विशेष म्हणजे आयसीसीच्या कसोटी गोलंदाजांच्या क्रमवारीतही रवींद्र जाडेजा प्रथम स्थानावर आहे.आयसीसी अष्टपैलूंच्या क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या रवींद्र जाडेजाच्या खात्यात 438 गुण आहेत. तर 431 गुणांसह शकिब दुसऱ्या स्थानावर आहे. जडेजाने श्रीलंका दौऱ्यातल्या कोलंबो कसोटीत अष्टपैलू कामगिरी बजावून, भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला होता.
दुसऱ्या कसोटीत भारताने श्रीलंकेवर एक डाव आणि53 धावांनी विजय मिळवत मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. जाडेजाने कोलंबो कसोटीत नाबाद 70 धावांची खेळी आणि दोन्ही डावांमध्ये मिळून सात बळी अशी कामगिरी बजावली. कोलंबो कसोटीतल्या प्रभावी अष्टपैलू खेळीमुळे आयसीसीच्या नामंकनात कसोटी त्यानं आपली गुणांची आघाडी वाढवली आहे.आयसीसी कसोटी अष्टपैलू क्रमवारीरवींद्र जडेजा 438शाकिब-उल-हसन 431आर अश्विन 413आयसीसी कसोटी गोलंदाज क्रमवारीरवींद्र जडेजा 897आर अश्विन 849रंगना हेराथ 828