भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका : भारताने पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर 203 धावांनी दणदणीत विजय मिळवला. भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने दुसऱ्या डावात पाच बळी मिळवत भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. या सामन्यात रोहित शर्मानं दोन्ही डावांत शतकी खेळी केली. मयांक अग्रवालनं द्विशतक झळकावलं. आर अश्विन आणि रवींद्र जडेजा यांनी पहिल्या व दुसऱ्या डावात एकूण अनुक्रमे आठ व 6 विकेट्स घेतल्या. भारतीय संघाने उत्तम सांघिक खेळाचे दर्शन घडवले.
चौथ्या डावात 395 धावांच पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेचा संपूर्ण संघ 191 धावांत तंबूत परतला. मोहम्मद शमीनं 10.5 षटकांत 35 धावा देत 5 विकेट्स घेतल्या. जडेजानंही चार विकेट्स घेतल्या. जडेजानं सलामीवीर एडन मार्कराम आणि डीन एल्गर यांना माघारी पाठवून टीम इंडियाला दमदार सुरुवात करून दिली. शिवाय व्हेर्नोन फिलेंडर आणि केशव महाराज यांनाही त्यानं शून्यावर माघारी पाठवले. शिवाय त्यानं 70 धावाही केल्या. पण, अष्टपैलू कामगिरी करूनही माजी सलामीवीर विरेंद्र सेहवागनं ट्विट करून जडेजाला वगळून अन्य सर्व खेळाडूंचे कौतुक केले. त्यानं लिहिले की,''रोहित शर्मानं स्वप्नवत सुरुवात केली. कसोटीत सलामीवीर म्हणून त्यानं दमदार खेळ केला. त्याला शुभेच्छा. मयांक, शमी, अश्विन, पुजारा यांच्या योगदानामुळे भारतीय संघाने विजय मिळवला.''
चाहत्याचे हे ट्विट जडेजानं रिट्विट करून नवा वाद निर्माण केला आहे.