Join us  

WTC Final Jersey : कसोटी वर्ल्ड कप फायनलसाठी टीम इंडियाची नवी जर्सी; रवींद्र जडेजाच्या फोटोवर वसीम जाफरनं दिली भन्नाट प्रतिक्रिया

World Test Championship Final : भारतीय संघ २ जूनला लंडन दौऱ्यावर रवाना होणार आहे. येथे १८ ते २३ जून या कालावधीत भारतीय संघ आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलमध्ये न्यूझीलंडचा सामना करणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2021 12:38 PM

Open in App

World Test Championship Final : भारतीय संघ २ जूनला लंडन दौऱ्यावर रवाना होणार आहे. येथे १८ ते २३ जून या कालावधीत भारतीय संघ आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलमध्ये न्यूझीलंडचा सामना करणार आहे. लंडन दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी भारतीय संघातील सर्व खेळाडू मुंबईत क्वारंटाईन कालावधी पूर्ण करत आहेत. या दरम्यान खेळाडू जिममध्ये कसून मेहनत घेत असल्याचा व्हिडीओ बीसीसीआयनं पोस्ट केला होता. काही दिवसांपूर्वी मयांक अग्रवालनं टीम इंडियाचा नवी ट्रेनिंग जर्सीची झलक दाखवली होती. आज रवींद्र जडेजानं टीम इंडियाच्या जर्सीची झलक पोस्ट केली. भारताचा माजी सलामीवीर वसीम जाफर यानं त्यावर भन्नाट प्रतिक्रिया दिली. ( Ravindra Jadeja reveals Team India’s new Jersey for the upcoming WTC Final against New Zealand, Wasim Jaffer react)

जडेजानं त्याच्या सोशल मीडियावर नव्या जर्सीच्या स्वेटरचा फोटो पोस्ट केला. त्यात त्यानं ९०व्या दशकात वापसी. असे लिहिले. या जर्सीवर MPL हा नवा स्पॉन्सर दिसत आहे. नोव्हेंबर २०२०त MPLनं बीसीसीआयशी करार केला. Nikeनं बीसीसीआयसोबतचा करार मोडला होता. त्यानंतर भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यादरम्यान रेट्रो जर्सी दिसली होती. १९९२च्या वर्ल्ड कप स्पर्धेतील जर्सीच्या थिमवर ती तयार केली गेली होती.   कोलकाता, हैदराबाद दुसऱ्या टप्प्यात नेतृत्वबदल करणार; जाणून घ्या नवा कर्णधार कोण असणार! वसीम जाफरची प्रतिक्रिया...

भारतीय संघ - विराट कोहली, अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, शुबमन गिल, मयांक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, रिषभ पंत, आर अश्वि, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दूल ठाकूर, उमेश यादव; लोकेश राहुल व वृद्धीमान सहा यांची निवड फिटनेस टेस्टनंतर  

राखीव खेळाडू - अभिमन्य इस्वरन, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान, अर्झान नागवास्वाला

डब्ल्यूटीसी फायनल ड्रॉ झाल्यास भारत-न्यूझीलंड संयुक्त विजेतेसामना ड्रॉ झाला किंवा ‘टाय’ झाल्यास दोन्ही संघांना संयुक्तपणे विजेते घोषित करण्यात येईल, असे आयसीसीने म्हटले आहे. १८ ते २२ जूनदरम्यान साऊथम्प्टन येथे हा सामना होईल. २३ जून हा राखीव दिवस असेल. हे दोन्ही निर्णय जून २०१८ ला आयसीसी कसोटी चॅम्पियनशिप सुरू करण्याआधीच घेण्यात आले होते, असेही आयसीसीने म्हटले आहे. 

असे असतील बदल... - भारतीय संघ कसोटीत एसजी तर न्यूझीलंड कुकाबुरा चेंडूचा वापर करतो. या अंतिम सामन्यात मात्र ग्रेड वन ड्यूक चेंडूचा वापर होणार आहे.- आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील नियमात करण्यात आलेले तीन बदल हे फायनलचा भाग असतील. शॉर्ट रन, खेळाडूंची समीक्षा आणि डीआरएस समीक्षा आदींचा समावेश असेल. - मैदानी पंचांनी शॉर्ट रन दिल्यानंतर तिसरे पंच स्वत: आढावा घेतील. पुढचा चेंडू टाकण्या-आधी स्वत:चा निर्णय मैदानी पंचांना कळवेल. - पायचीतसाठी डीआरएस घेण्याआधी क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाचा कर्णधार किंवा बाद झालेला फलंदाज चेंडू खेळण्याचा प्रयत्न झाला होता का, याबाबत पंचांकडे विचारणा करू शकेल. - पायचीतसाठी डीआरएस घेण्याबाबत विकेटचे क्षेत्र वाढवून ते स्टम्पच्या उंचीपर्यंत करण्यात आले आहे.

 

टॅग्स :जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धाभारत विरुद्ध न्यूझीलंडरवींद्र जडेजावासिम जाफर