Join us

रिषभ पंतच्या संघाविरुद्ध जड्डूची हवा; 'पंजा' मारत साधला 'द्विशतकी' डाव

गोलंदाजीतील सर्वोत्तम कामगिरीनंतर फलंदाजीवेळीही फटकेबाजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2025 18:02 IST

Open in App

 भारतीय क्रिकेट संघातील अनेक स्टार खेळाडू देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेत खेळताना दिसत आहेत. रणजी करंडक स्पर्धेतील दुसऱ्या फेरीत एका बाजूला रोहित शर्मा, रिषभ पंत, शुबमन गिल, यशस्वी जैस्वाल आणि श्रेयस अय्यर हे पाच स्टार फ्लॉप ठरले. दुसऱ्या बाजूला रवींद्र जडेजानं 'पंजा' मारत 'द्विशतकी' डाव साधला आहे.

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

रिषभ पंतच्या संघा विरुद्ध जड्डूचा 'पंजा'

रणजी ट्रॉफी २०२४-२५- च्या हंगामातील ग्रुप-डी मध्ये सौराष्ट्र आणि दिल्ली यांच्यातील लढत राजकोटच्या मैदानात रंगली आहे. रिषभ पंतच्या संघाविरुद्ध भारतीय संघातील ऑलराउंडर जड्डूनं पाच विकेट्स घेतल्या. त्याच्या या कामगिरीच्या जोरावरच सौराष्ट्र संघानं दिल्ली संघाचा पहिला डाव फक्त ८८ धावांत आटोपला.

रवींद्र जडेजाने १८ व्या वेळी पाच विकेट्स घेत साधला 'द्विशतकी' डाव सौराष्ट्र संघाकडून रणजी स्पर्धेत खेळताना रवींद्र जडेजाने खास टप्पाही पार केला. पंतच्या संघाविरुद्ध १८ व्या वेळी पाच विकेट्स घेत त्याने रणजी करंडक स्पर्धेतील २०० विकेट्सचा टप्पाही पार केला. यासह जयदेव उनाडकट, धर्मेंद्रसिंह जडेजा आणि कमलेश मकवाना यांच्यानंतर सौराष्ट्रकडून २०० विकेट्स घेणारा जड्डू चौथा गौलंदाजठरला आहे. रवींद्र जडेजा रणजी करंडक स्पर्धेच्या इतिहासात ३००० धावाअन् २०० विकेट्स अशी कामगिरी करणारा २० वा खेळाडू ठरला आहे. गोलंदाजीतील सर्वोत्तम कामगिरीनंतर फलंदाजीमध्ये पहिल्या डावात जडेजानं ३६ चेंडूत ३८ धावांची खेळी केली. यात त्याने २ चौकार आणि ३ षटकारही मारल्याचे पाहायला मिळाले.

 

चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेआधी आत्मविश्वास उंचावणारी कामगिरी

एका बाजूला चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठी भारतीय संघात असलेल्या पाच जणांचा फ्लॉप शो पाहायला मिळाला असताना रवींद्र जडेजानं मात्र आत्मविश्वास उंचावणारी खेळी करून दाखवली आहे. १९ फेब्रुवारीपासून रंगणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठी जड्डूही भारतीय संघाचा भाग आहे. २०१३ मध्ये भारतीय संघाने चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा जिंकली होती. यावेळी जड्डू संघाचा भाग होता. एवढेच नाही तर त्याने या स्पर्धेत वेस्ट इंडिज विरुद्धच्या सामन्यात पाच विकेट्स घेतल्या होत्या. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत पाच विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीतील तो एकमेव भारतीय गोलंदाज आहे. 

टॅग्स :रवींद्र जडेजारणजी करंडकचॅम्पियन्स ट्रॉफी