Join us  

Ravindra Jadeja, IND vs SL 2nd T20I : 4,4,4,4,4,4,4,6; रवींद्र जडेजा कॅप्टन रोहितच्या विश्वासावर खरा उतरला, वादळासारखा आला अन् श्रीलंकेचा पालापाचोळा केला, Video

Ravindra Jadeja, IND vs SL 2nd T20I : भारतीय संघाने दुसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात ७ विकेट्स व १७ चेंडू राखून श्रीलंकेला नमवले आणि तीन सामन्यांच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2022 11:59 PM

Open in App

Ravindra Jadeja, IND vs SL 2nd T20I : भारतीय संघाने दुसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात ७ विकेट्स व १७ चेंडू राखून श्रीलंकेला नमवले आणि तीन सामन्यांच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली. भारताने सलग ११ ट्वेंटी-२० सामने जिंकून इतिहास घडवला आहे आणि ही आतापर्यंतची भारताची सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे. श्रीलंकेच्या ५ बाद १८३ धावांचा पाठलाग करताना भारताने रोहित शर्मा व इशान किशन यांच्या विकेट झटपट गमावल्या. पण, श्रेयस अय्यर ( Shreyas Iyer), संजू सॅमसन ( Sanju Samson) आणि रवींद्र जडेजा ( Ravindra Jadeja) यांनी दमदार खेळी करून भारताचा विजय पक्का केला. नाबाद ७४ धावांची खेळी करणाऱ्या अय्यरला मॅन ऑफ दी मॅच म्हणून गौरविण्यात आले. पण, आजच्या सामन्यात  सर रवींद्र जडेजाने कर्णधार रोहितचा विश्वास सार्थ ठरवला.

पहिल्या ट्वेंटी-२० सामन्यात रोहितने  अष्टपैलू खेळाडू जडेजाला फलंदाजीसाठी संजू सॅमसनच्या आधी पाठवले होते. सामन्यानंतर जडेजाकडून आम्हाला बऱ्याच अपेक्षा आहेत असे मत रोहितने व्यक्त केले. आज त्या अपेक्षांवर जडेजा खरा उतरला. श्रीलंकेच्या पथून निसांका ( ७५), कर्णधार दासून शनाका ( ४७*) व दनुष्का गुणतिलका ( ३८) यांनी दमदार खेळ केला. निसांका व शनाका यांनी अखेरच्या पाच षटकांत ८० धावा चोपताना १८३ धावांचा डोंगर उभा केला.

रोहित  ( १) व इशान ( १६) हे दोघंही ४४ धावांवर माघारी परतल्यानंतर अय्यर व संजू यांनी तिसऱ्या विकेटसाठी ४७ चेंडूंत ८४ धावांची भागीदारी केली. त्यानंतर अय्यर  व जडेजा यांनी २६ चेंडूंत ५८ धावा कुटल्या. संजू माघारी परतला तेव्हा भारताला विजयासाठी ५६ धावा हव्या होत्या आणि जडेजाने पहिल्या चेंडूपासून फटकेबाजी सुरू केली. त्याने १८ चेंडूंत ७ चौकार व १ षटकारांसह ४५ धावा चोपताना मॅच फिनिशरची भूमिका वठवली. 

पाहा व्हिडीओ..

 

टॅग्स :भारत विरुद्ध श्रीलंकारवींद्र जडेजारोहित शर्मा
Open in App