नवी दिल्ली : राष्ट्रीय डोपिंग विरोधी एजन्सीने (नाडा) २०२३ मध्ये अष्टपैलू रवींद्र जडेजाची जानेवारी ते मे या कालावधीत तीन वेळा डोप चाचणी घेतली. या पाच महिन्यांत ५५ पुरुष आणि महिला क्रिकेटपटूंचे ५८ नमुने तपासणीसाठी घेण्यात आले. गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत सुरुवातीच्या काळातच हा आकडा मोठा ठरला. २०२१ ला ५४ आणि २०२२ ला ६० नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते. यंदा कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांची डोप चाचणी झाली नाही. २०२१ आणि २०२२ ला रोहितची तीन- तीन वेळा चाचणी झाली होती.
हार्दिक पांड्याच्या लघवीचे नमुने एप्रिलमध्ये घेण्यात आले. २०२२ मध्ये २० महिला खेळाडूंचे नमुने गोळा करण्यात आले होते. यंदा पाच महिन्यांत केवळ दोन महिला खेळाडूंची डोप चाचणी झाली. कर्णधार हरमनप्रीत कौर व उपकर्णधार स्मृती मानधना यांचे नमुने १२ जानेवारी रोजी मुंबईत घेण्यात आले होते. आतापर्यंत क्रिकेटपटूंचे जे ५८ नमुने घेण्यात आले.
...यांचीही झाली चाचणी
जानेवारी-मे दरम्यान ज्या क्रिकेटपटूंची डोप चाचणी झाली त्यात सूर्यकुमार , राहुल, किशन, मोहम्मद सिराज, दीपक चाहर, मयंक अग्रवाल, राहुल त्रिपाठी, भुवनेश्वर कुमार, रिद्धिमान साहा, दिनेश कार्तिक, यशस्वी जैस्वाल, अंबाती रायडू, पीयूष चावला, मनीष पांडे यांचा समावेश आहे. आयपीएलदरम्यान काही विदेशी क्रिकेटपटूंचीही डोप चाचणी झाली.
Web Title: Ravindra Jadeja was tested for dope three times
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.