Join us  

"तुझ्यामुळे माझी नंतर हालत होते..." रिंकू सिंगवर भडकला विराट कोहली, Video Viral 

कोलकाताच्या ईडन गार्डनवर रविवारी झालेला कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हा सामना चुरशीचा झाला.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2024 3:24 PM

Open in App

IPL 2024 RCB vs KKR : कोलकाताच्या ईडन गार्डनवर रविवारी झालेला कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हा सामना चुरशीचा झाला. प्ले ऑफच्या शर्यतीत राहण्यासाठी RCB ला हा सामना जिंकणे महत्त्वाचे होते आणि त्यांनी त्यासाठी जोर लावलाही. पण, १ धावेने त्यांच हार झाली आणि KKR ने १० गुणांसह पुन्हा दुसऱ्या स्थानावर झेप घेतली. पण, या सामन्यापूर्वी RCB चा स्टार फलंदाज विराट कोहली ( Virat Kohli) आणि KKR चा रिंकू सिंग ( Rinku Singh) यांच्यातल्या संवादाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला गेला आहे. यात विराट KKR च्या खेळाडूवर रागावलेला दिसतोय... 

RCB vs KKR सामन्याच्या पूर्वसंध्येला रिंकूने RCB स्टार विराटला त्याने दिलेली बॅट तोडल्याचे सांगितले. नाईट रायडर्सने तुटलेल्या बॅटवरून दोघांमधील संभाषणाचा व्हिडिओ शेअर केला आहे.  

  • रिंकू सिंग:  एका फिरकीपटूविरुद्ध खेळताना तुम्ही दिलेली बॅट तोडली.
  • विराट कोहली : माझी बॅट?
  • रिंकू सिंग : हो
  • विराट कोहली: तू स्पिनरविरुद्ध बॅट तोडलीस? कुठे तुटलीय?
  • रिंकू सिंग : मधूनच.
  • विराट कोहली: मग मी काय करू?
  • रिंकू सिंग: मी फक्त तुम्हाला माहिती देत ​​होतो.
  • विराट कोहली: काही हरकत नाही. तू मला सांगितलेस ते चांगले केलेस. पण मला माहितीची गरज नाही.
  • विराट कोहली: तू याआधी माझ्याकडून बॅट घेतली होती. आता तुला दुसऱ्या सामन्यात दुसरी बॅट हवी आहे का? तुमच्यामुळे मला नंतर त्याचे परिणाम भोगावे लागतील.
  • विराट कोहली: मी तुला शपथ देतो, पुन्हा बॅट तोडणार नाही. मी तुला तुटलेली बॅट दाखवू शकतो. 

टॅग्स :आयपीएल २०२४विराट कोहलीरिंकू सिंगऑफ द फिल्ड